शिरूर प्रतिनिधी
बाभुळसर बु . ता शिरूर जि पुणे येथे आदिवासी समाजातील क्रांतिवीर समशेरसिंग भोसले यांच्या जयंतीनिमित्त तसेच क्रांतीवीर हुतात्मा दिनानिमित्त गावची अंतर्गत स्वच्छता व साफसफाई करण्यात आली . बाभुळसर बु गावचे सरपंच दिपाली नागवडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे सकाळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पूजन करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये परिक्रमा शैक्षणिक संकुल चे उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे गणेश मचाले माजी सरपंच व विद्यमान सदस्य, भरत नागवडे विद्यमान चेअरमन बाभुळसर बु. विकास सोसायटी, ज्येष्ठ बबनमामा टेकवडे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष महेंद्र नागवडे, प्रमोद गरुड संचालक गणेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन मनोज मचाले, महेंद्र रणदिवे संचालक संत तुकाराम सोसायटी, संजय पांडुरंग नागवडे, श्रीदत्त ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन हरिभाऊ नागवडे , संतोष टेकवडे,संचालक शरद बाबुराव नागवडे,अमित नागवडे मा. चेअरमन, युवा कार्यकर्ते विठ्ठल नागवडे ,गणेश दूध संस्थेचे चेअरमन नामदेव नागवडे, ग्रामसेवक यु डी गायकवाड, संतोष भंडलकर आदी बहुसंख्येने उपस्थित होते .तसेच आदिवासी समाजाचेवतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष पलांडे साबण भोसले व अध्यक्षा पश्चिम महाराष्ट्र अनिता पलांडे भोसले तसेच शिरूर तालुका अध्यक्ष मनोज काळे उपाध्यक्ष अनिल भोसले कार्यकारणी सदस्य बाबू भोसले, लुच्चा भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी बोलताना दिपाली नागवडे यांनी आदिवासी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील,त्यांना आदिवासी म्हणून येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जातील.यावेळी समशेरसिंग भोसले यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली सरपंचांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी आव्हान केले त्यानुसार शिस्तीत मिरवणूक होऊन कार्यक्रमाची सांगता झाली .
