पुणे प्रतिनिधी:सागर पवार
दिनांक १७/०६/२४ रोजी आठवले साहेबांनी मुंबई येथील निवासस्थानी नीलम ताई यांची भेट घेतली.
भेटी दरम्यान साहेबांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मराठवाडा विद्यापीठाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ करावे या आंदोलना पासून सुरू झालेला ते आज पर्यंतच्या राजकीय प्रवासात जीवनातील अनेक चढ,उतार व आपला अनुभव कथन करत मार्गदर्शन केले .तसेच ताईंनी रिपब्लिकन पक्षापासून सुरू झालेली राजकीय वाटचाल व बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती व भीम शक्ती कल्पनेचा केलेला उदय कसा झाला , त्यातून शिवसैनिक व भीमसैनिक यांचे निर्माण झालेले एकोप्याचे नाते याचा प्रकर्षाने उल्लेख केला .
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष व महायुती अधिक जोमाने व नव्या उमेदीने काम करेल असा विश्वास व्यक्त केला .
याप्रसंगी आठवले साहेब व नीलम ताई यांच्या अनुभवाचा व राजकीय प्रवासाचा निश्चितच उपयोग होईल व पदाधिकार्याचा आत्मविश्वास वाढेल असे मत उपस्थित महिला पदाधिकारी यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कलाताई शिंदे उपनेता शिवसेना व शिल्पा बोडके या ही उपस्थित होत्या.







Users Today : 1
Users Yesterday : 9