सरदवाडी प्रतिनिधी: दतात्रय कर्डिले
पु
णे जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांचे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असून त्यांची आजपर्यंत 55 पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच त्यांच्या साहित्य निर्मितीची दखल महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने घेऊन त्यांच्या कळो निसर्ग मानवा या कवितेची निवड सहावीच्या पाठ्यपुस्तकात केली आहे. तर दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहाची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात नुकतीच झाली असल्याने त्यांचे साहित्यिक कार्य युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत लोकप्रिय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.
जेष्ठ लेखक तथा निवृत्त तहसीलदार सूर्यकांत रखमाजी थोरात यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा, ग्रंथतुला व काळीज या कथासंग्रहाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते. यावेळी काळीज या कथासंग्रहाचे प्रकाशन साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आढळराव पाटील उपस्थित होते. यावी आढळराव पाटील यांनी मंचर येथील साहित्यिक कार्याचा आढावा घेतला. शांता शेळके, ग.ह. पाटील, भीमसेन देठे यांचा साहित्यिक वारसा चालवणारी पिढी तयार झाली पाहिजे, असे मत यावेळी खासदार आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते वसंतराव जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून शिरूरचे लोकप्रिय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, साहित्यिक सचिन बेंडभर पाटील, ज्येष्ठ साहित्यिक सूर्यकांत थोरात, स्तंभ लेखक व पत्रकार विठ्ठल वळसे पाटील, कोल्हापूर येथील निवृत्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, पुणे येथील निवृत्त उपविभागीय अधिकारी सुनंदा गायकवाड आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.






Users Today : 1
Users Yesterday : 9