राज्यात दुध भेसळखोरांवर कारवाई सुरू; पण प्रामाणिक दूध उत्पादकांच्या दुधाचे दर कधी वाढणार?

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी .संतोष साळुंके
ता.12 .राज्यभरात दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. भेसळीला आळा बसावा, ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे, हा या कारवाईचा उद्देश असला तरी सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात मात्र एकच प्रश्न निर्माण झाला आहे… भेसळखोरांवर कारवाई होत असताना आमच्या दुधाला योग्य दर कधी मिळणार?

Screenshot

राज्यातील लाखो शेतकरी दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहेत. पशुखाद्य, औषधे, मजुरी, वीज आणि देखभाल यांचा खर्च सातत्याने वाढत असताना दूध खरेदी दरात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे दूध उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, राज्यभरात दूध भेसळ करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई सुरू असल्याने शुद्ध दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. भेसळीमुळे बाजारात कृत्रिमरीत्या स्वस्त दूध उपलब्ध होत असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होत होता. त्यामुळे प्रामाणिक दूध उत्पादकांना योग्य मोबदला मिळत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, केवळ भेसळखोरांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. दूध उत्पादनाचा वाढता खर्च लक्षात घेऊन शेतकऱ्यांना किफायतशीर दर देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शासनाने आणि दूध संघांनी तातडीने दरवाढीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

भेसळविरोधी कारवाईचे स्वागत होत असले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना कधी मिळणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आता शासन शेतकऱ्यांच्या दुधाला न्याय्य दर देण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे राज्यभरातील दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 3 3 0 0
Users Today : 1
Users Yesterday : 187