Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

“अति तिथे माती “

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
नांदेड येथील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांचे मराठी बालसाहित्यात फार मोठे योगदान आहे. बालसाहित्य आणि बालशिक्षण हे त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचे विषय आहेत. गेली तीन तपे ते अविरत बालसाहित्यनिर्मिती करत आहेत. बालसाहित्यातून बालशिक्षण हसतखेळत आणि आनंददायी झाले पाहिजे, यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.

त्यासाठी ते आपल्या लेखनात वेगवेगळे प्रयोग करतात. नुकताच त्यांचा दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेला ‘अति तेथे माती‘ हा बालकथासंग्रह छोट्या दोस्तांच्या भेटीला आला आहे.
या कथासंग्रहात एकूण बारा कथांचा समावेश आहे. सर्वच कथा वाचनीय असून प्रत्येक कथेतून मुलांना छानसा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे या कथा काव्य निर्मिती करून तयार केल्या असल्याने त्या बालवाचकांना विशेष भावतात. त्यामुळे कथा वाचताना त्या कथेची मजा मुलांना अनुभवायला मिळते. तसेच मुलांच्या भाव विश्वाशी त्या निगडित असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या काळजाला लगेच भिडतात.

निखळ मनोरंजनाबरोबर जीवनाचे मर्म सांगणाऱ्या कथा : अति तिथे माती

असला राजा नको आम्हाला या पहिल्याच कथेत लेखकाने काव्यनिर्मितीच्या साह्याने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. एका जंगलात सिंह जंगलचा राजा होता. सारे प्राणी तेथे गुण्यागोविंदाने राहत होते. पण पुढे राजा म्हातारा झाला. जंगलावरचा त्याचा ताबा कमी झाला. तेव्हा वाघ त्या जंगलात सर्वांना त्रास देऊ लागला. त्याची तक्रार घेऊन सर्व प्राणी सिंहाकडे गेले परंतु सिंहाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे वाघ आणखीनच शेफारला व तो इतर प्राण्यांना अधिक त्रास देऊ लागला. वाघाची पाहून नंतर साप देखील बिथरला व तोही प्राण्यांना त्रास देऊ लागला. त्याचीही तक्रार सिंह पुढे गेली परंतु सिंह म्हतारा झाल्यामुळे त्यांनी पुन्हा चालढकल सुरू केली. पुढे गाढवही भलतेच बिथरले. तेही प्राण्यांना त्रास देऊ लागले. तिघांनीही जंगलाची कायदे कानून तोडले आणि बिचाऱ्या प्रजेला भांडावून सोडले. तेव्हा सारी प्रजा एक होऊन त्यांनी सिंह विरोधात बंड पुकारले. ते पाहून सिंह दूर पळून गेला. वाघ सिंह गाढवालाही प्रजेने हद्दपार केले. मग शेवटी सर्व प्राणी एकत्र आले व त्यांनी एक नियमावली बनवून जंगलाचे नियम पाळण्याचे ठरवले तेव्हापासून सर्व गुण्यागोविंदाने राहू लागले. अशाप्रकारे पहिल्याच कथेत लेखकाने बालवाचकांची मन जिंकले आहे. या पहिल्या कथेतूनच पुढील कथांची उत्सुकता बालवाचकांना लागते व ते कथासंग्रह मोठ्या आनंदाने वाचू लागतात.

हत्ती जमिनीवर आले या कथेत लेखकाने कल्पनेच्या भरारीने बालवाचकांना आपल्या कल्पनेच्या दुनियेत घेऊन जात एक मनोरंजक कथा त्यांच्यापुढे मांडली आहे. सुरुवातीला हत्तीची जुजबी माहिती देत मग लेखकांनी कथेला सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्ञानाबरोबर मनोरंजनही विद्यार्थ्यांचे नकळतपणे होऊन जाते.
पूर्वी हत्तीला पंख होते. पंखाच्या जोरावर ते आकाशात उडायचे. एकदा हत्तींचा थवा असाच आकाशात उडत होता आणि तो एका झाडावर येऊन बसला. त्या झाडाखाली विद्यार्थी ज्ञान घेत बसले होते. झाडाला हत्तीचे ओझे पेलवले नाही. झाडाला भार झाल्यावर झाडाच्या फांद्या खाली आल्या व हत्ती खाली पडले. त्यात दहा पंधरा विद्यार्थी जागीच ठार झाले. दीर्घतमस मुनिंनाही किरकोळ जखमा झाल्या. तेव्हा ऋषींचा संताप अनावर झाला व त्यांनी त्यांना शाप दिला की तुमचे पंख झडून जातील. पाय तुमचे जमिनीवर येतील. मग तेव्हापासून हत्ती जमिनीवर चालू लागले. या गोष्टीत लेखकाने मुलांना छान संदेश दिलेला आहे की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. कोणालाही निरर्थक त्रास देऊ नये. अंगी कितीही बळ असो त्या अफाट शक्तीचा कधीही दुरुपयोग करू नये. कारण वाईट कृत्याचे फळ वाईटच मिळते.
पुणे येथील दिलीपराज प्रकाशनने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. प्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे, यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ व प्रसंगानुरूप दिलेली आतील चित्रे पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकतात. डॉ. सुरेश सावंत यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा.

[सचिन बेंडभर पाटील
कार्यकारणी सदस्य,
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था.]

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21