पुणे प्रतिनिधी : सागर पवार
पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाख रुपयांची तात्काळ मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी TVJA च्या कार्यकारिणी समोर जाहीर केलं.

पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या ट्रक चालक क्लीनर आणि ट्रक मालकावर होणार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या कार्यकारिणीला आश्वासन.
टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथिगृह येथे भेट घेतली. पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार हर्षल भदाणे पाटील याच्या कुटुंबीयांना तात्काळ दहा लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षल च्या कुटुंबीयांना लवकरच दहा लाख रुपयांचा धनादेश सपूर्द करण्यात येईल.

तसंच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या ट्रक चालक, ट्रक क्लीनर आणि ट्रक मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं. हे प्रकरण फास्ट ट्रॅ्क कोर्टात चालवण्याच्या TVJA च्या मागणीला गृहमंत्र्यांनी मान्यता दिली.






Users Today : 4
Users Yesterday : 9