शिरूर प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य बैठक नुकतीच संत शिरोमणी गोरोबा काका समाधी स्थळ तर येथे संपन्न झाली. या बैठकीत राज्य अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर भागवत तर राज्य संपर्क प्रमुख पदी भगवान श्रीमंदिलकर यांची निवड करण्यात आली.
संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या वाड्याच्या वस्तूचा 10 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहाने अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्या वतीने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सातारा जिल्हा यांच्या वतीने घेण्यात आले होते.
या बैठकीचे अध्यक्ष स्थान अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे मावळते प्रदेशाध्यक्ष श्याम शेठ राजे यांनी भूषविले.
या बैठकीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन जगदाळे,मावळते प्रदेश श्यामशेठ राजे,कोअर कमिटी अध्यक्ष विश्वनाथ कोलमकर,सर्व कोअर कमिटी सदस्य,सोमनाथ शेठ सोनवणे, माती कला बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता डाळजकर, उपाध्यक्ष किसन काळे,व्यंकट गोरगिले, प्रकाश कुंभार,राजेंद्र सावंदे,यांच्यासह सर्व सदस्य,पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.ती खालील प्रमाणे.
अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य नूतन कार्यकारणी
मा.ज्ञानेश्वर भागवत
प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य
मा.व्यंकटराव रामराव गोरगिळे
प्रदेश युवक अध्यक्ष
मा.भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर
राज्य संपर्क प्रमुख
मा.बळवंतराव कुंभार
कार्याध्यक्ष
मा.रामदास कुंभार
कार्याध्यक्ष
नथुशेठ पिरगुंटकर
खजिनदार
मा.सुरेश कुंभार
सचिव
मा. रेवनकुळे श्रावण कुंभार
प्रदेश उपाध्यक्ष
मा.कृष्णा भाऊ सोनवणे
प्रदेशाध्यक्ष विट भट्टी आघाडी
सौ. किर्तिमाला महादेव खटावकर
प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी
मा.नंदू मामा सोनवणे
नाशिक जिल्हा अध्यक्ष
मा.लक्ष्मण राम कुंभार
पुणे जिल्हा अध्यक्ष
सर्व पदाधिकारी यांना संस्थेचे मावळते प्रदेशाध्यक्ष श्याम शेठ राजे, कोअर कमिटी अध्यक्ष विश्वनाथ कोलमकर, संस्थापक अध्यक्ष मोहन जगदाळे, नूतन अध्यक्ष ज्ञानेश्वर भागवत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.सर्व नूतन पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






Users Today : 9
Users Yesterday : 9