शिरूर प्रतिनिधी:
दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी पाणगाव तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य ,आयोजित धाराशिव लोकसभा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली.
या सभेमध्ये अर्चना ताई पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी उपस्थित रामोशी, बेडर बेरड बंधू भगिनींना स्वातंत्र्य काळापासून असणाऱ्या मागण्या या सरकारने काही प्रमाणात पूर्ण केलेल्या आहेत व मी थोड्याफार राहिलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येत या महायुती सरकारच्या उमेदवाराला निवडून देऊ द्यावे व आपल्या हक्काचा आमदार असावा, यासाठी सर्वांनी हात वरती करून शब्द द्यावा अशी घोषणा सभेत केली असता उपस्थित सर्वांनीच हात वरती करत, जय मल्हार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांना शब्द दिला.
यावेळी उपस्थित
आमदार राजाभाऊ राऊत, देविदास म्हसुगुडे ,विष्णू आप्पा चव्हाण ,लखन गुजले,
सुधीर दादा नाईक ,गणेश शिरतोडे,बाप्पू गुजले ,बाळू चव्हाण ,संतोष जाधव ,अतुल मलमे ,सचीन बाप्पू माने,राहुल मदने ,किरण जाधव आदी बार्शी तालुक्यातील रामोशी बेडर बेरड समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.






Users Today : 12
Users Yesterday : 9