Breaking News
अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश शिरूर नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात मनसेचे आमरण उपोषण जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन राज्यात दुध भेसळखोरांवर कारवाई सुरू; पण प्रामाणिक दूध उत्पादकांच्या दुधाचे दर कधी वाढणार? मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारतीत अडकलेल्या ७ जणांचा मृत्यू; एकाचा अद्यापही शोध सुरू दुर्घटनेतील मृतांची संख्या आठवर श्री वाघेश्वर प्रासादिक दिंडी सोहळ्याचे भक्तीपूर्ण वातावरणात प्रस्थान. आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

शिरूर नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात मनसेचे आमरण उपोषण जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर तालुका उपाध्यक्ष महिबुब जैनुद्दीन सय्यद यांनी शिरूर नगरपरिषदेच्या कथित निष्क्रिय कारभाराविरोधात 13 जुलै 2026 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे .

यासंदर्भात त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिरूर नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही अनेक नागरी प्रश्न प्रलंबित असून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.

 

मनसेने उपोषणाद्वारे मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –

१)खत खड्यावरील प्लॉस्टिक, पड्रा, रिकाम्या बाटल्या तसेच फाटके कपडे यांची कोणतीही निविदा न काढता परस्पर विल्हेवाट लावली जाते
२)त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावणे म्हणन ठेकेदारावर गुन्हा दाखल करणे
नगरपरिषद सफाई कामगाराना श्रम साफल्य योजेनेतून तात्काळ घरे मिळावी
३)सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी टोरँटो गॅस कंपनीवर
गुन्हा दाखल करावा.
४)गौण खनिज उत्खनन प्रकरणी ठेकेदाराकड्रन दंड वसूल करावा.
५)सवच्छता निरीक्षक यांची शासकीय आरोग्य खात्यामार्फत आरोग्य तपासणी करून तात्परत्या सवरूपात सफाई कर्मचारी संदीप चव्हाण यांची प्रभारी सहायक स्वच्छता निरीक्षक म्हणून नेमणूक करावी.
६)किमान वेतन कायद्याची अमलबजावणी न करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करूने त्यांना काळ्या यादीत टाकावे
७)शहरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी धोकादायक विद्युत वाहिनी कादून टाकणे.


यावेळी आम्ही शिरूरकर फाऊडेशन चे अध्यक्ष रवीबापु सानप,मनसे चे शिरूर तालुका सचिव रवी लेंडे,प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे,संदीप कडेकर व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपोषणास पाठिंबा दिला.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 3 5 5 5
Users Today : 6
Users Yesterday : 250