कोरेगाव भीमा: प्रतिनिधी(विनायक साबळे)
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे गेल्या काही दिवसांपासून एका माकडाच जोडपं त्यांच्या पिल्ला सोबत फिरताना अनेकांनी पाहिले होते.
त्या तिघांची अनोखी साथ गावकऱ्यांच्या लक्षात राहील अशी होती .
आई बाळ आणि त्यांचं जणू एखादं राखणदार मित्र असे नाते असताना , अचानक झालेल्या हृदयद्रावक घटनेने ही तिघांची साथ कायमची संपली आहे.
कोरेगाव भीमा येथे माकडाच्या चिमुकल्या पिल्लाचा दुर्दैवी विजेच्या धक्क्याने,अपघाती मृत्यू झाला, त्याला वाचवायला गेलेल्या माकडीणीनंही प्राण गमवावे लागले असून त्या दोघांच्या मृतदेहाशेजारी तिसरं माकड शांतपणे, हालचाल न करता बसलेलं आणि न डोकावणारे अश्रू व फक्त शून्यात बघणारी नजर हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले.वानर जातीच्या माकडाचे पिल्लू विजेच्या तारे जवळ खेळताना विजेचा धक्का लागून किंचाळू लागल, यावेळी त्या पिलाची आई त्याला वाचवण्यासाठी गेली . मात्र दोघेही विजेच्या धक्क्याने मृत पावले .
https://punegraminnews.in/archives/1821
त्यानंतर तिसरे माकड त्यांच्याजवळ हृदयदावक दृश्यात बसून राहिले याबाबतची माहिती सरपंच संदीप ढेरंगे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना दिल्यानंतर वनपाल बबन दहातोंडे, वन्यजीव बचाव पथकाचे शेरखान शेख, गणेश टिळेकर यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृत माकडांना ताब्यात घेत शवविच्छेदन साठी पशुवैद्यकीय कार्यालयात नेले, दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल येडे यांनी मृत वाकडांचे श्रवविच्छेदन करत वन विभागाच्या वतीने त्यांचे दफन करण्यात आल्याचे वनरक्षक बबन दातोंडे यांनी सांगितले. तर अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये खेळणारे आणि फिरणारे लहान मुलांचे आकर्षण ठरणारे माकड व त्यांचे पिल्लू मेल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
अजून ही माणुसकी आहे पण…… कुठे
कोण म्हणतं की भावना फक्त माणसांमध्ये असतात? माकडांच्या या वागणुकीने खऱ्या अर्थाने माणुसकीला आरसा दाखवला आहे. माकडीण गेली, पिल्लूही गेले, पण तिसरं माकड अजूनही थांबलेलं होत ते कुणासाठी? प्रेमासाठी? आठवणींसाठी? की आपल्याला एक धडा देण्यासाठी…?
