शिरूर प्रतिनिधी :
शिरूर शहर व शिरूर रामलिंग ग्रामपंचायत,तसेच इतर अनेक परिसरात आमदार अशोक पवार यांनी कोट्यावधीचा निधी आणून या भागाचा कायापालट सुरू केल्या मुळे,येणाऱ्या निवडणुकीत सर्व मतदारांनी कार्यसम्राट आमदार अशोक यांच्या मागे उभे खंबीर पणे राहून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राणीताई कर्डिले यांनी केले आहे.
शिरूर शहरात व पंचक्रोशी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या भागात मतदार यांच्या गाठीभेटी घेणे व बापूंनी केलेल्या कामाची माहिती देत,बापूंना मतदान करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे .
या भागातील महिला व तरुण कार्यकर्त्यांनी वाडी वस्त्यावर जाऊन महिला पुरुष मतदारांना व तरुण युवतींना आमदार अशोक पवार यांच्या कामाचे पत्रक वाटून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा प्रचार सुरू केलेला दिसत आहे.
यावेळी राणी कर्डिले,शामकांत वरपे,तुषार दसगुडे,शरद पवार,केशव शिंदे,संतोष बोऱ्हाडे,यशवंत कर्डिले, अक्षय जाधव,उमेश घावटे,ओम कर्डिले,राजू शेवाळे, साई भोसले,सुभाष गोऱ्हे,भरत दसगुडे , अतिष शेवाळे उपस्थित होते.
शिरूर शहर येथे ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुंभार आळी, ढोर आळी, मुंबई बाजार येथील नागरिकांच्या भेटीगाठी घेउन आमदार अशोक पवार यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहीती देणारे पत्रक नागरिकांना देण्यात आले .
शिरूर शहर युवक अध्यक्ष अमित शिर्के , पुणे जिल्हा राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिल शेख , योगेश जामदार ,
शहर युवक उपाध्यक्ष परवेझ शेख, शरद जामदार, आकाश जामदार, चरण जामदार,तेजस जामदार, प्रदीप हांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते .






Users Today : 0
Users Yesterday : 9