शिरूर प्रतिनिधी
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान ४.०” हे शिरूर नगरपरिषद मध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. “माझी वस ुंधरा अभियान ४.०” चा अंतिम निकाल शासना मार्फत दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आला.
सदरील माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत राज्यस्तरावरील २५-५० हजार लोकसंख्या गटात शिरूर नगरपरिषदने सर्वोउत्तम कामगिरी करून राज्यात प्रथम क्रमांकाचे ४कोटी रुपयांचे पारितोषिक रुपये मिळवले आहे.
त्याचबरोबर भूमी थीमॅटीक मधील उच्चत्तम कामगिरी बद्दल ही राज्यात २५ ते ५० लोकसंख्या असलेल्या गटात प्रथम क्रमांकाचे १ कोटी ५० लक्षाचे पारितोषिक मिळाले असल्याची माहिती नगरपरिषदे चे मुख्या धीकरी प्रितम पाटील यांच्याकडून प्राप्त झाली आहे.






Users Today : 0
Users Yesterday : 9