शिरूर प्रतिनिधी
स्लिक्स कंपनी प्रस्तुत ग्लॅमर फॅशन आयकॉन्स सीझन २. शो डायरेक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, काजल कोरडे आणि तन्वी मुळे यांनी या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले.
ही सौंदर्यस्पर्धा द फर्न रेसिडेन्सी पुणे येथे यशस्विरीत्या पार पडली.
आंबेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प. शंकर महाराज मुळे तसेच युवांश फॅशन आणि अनुराधा कलेक्शनचे ओनर मयूर ओसवाल व विशाल पिंगळे, संतोष मुळे, मीनाक्षी पाटील आणि रुपाली मुळे यांनी यावेळी दीप प्रज्वलन केले.
तसेच वीरा डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशी गणेश वंदना सादर करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या सौंदर्य स्पर्धेमध्ये पंचावन्नहुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.विविध जिल्ह्यांमधून, विविध राज्यांमधून तसेच परदेशातूनही स्पर्धक आले होते.
स्पर्धकांनी भारतातील विविध राज्यांची वेशभूषा परिधान करून भारतातील विविधतेतून एकता आणि भारताची संस्कृती दाखवली होती.
एस.बी. फॅशन इंस्टिट्यूटच्या ओनर स्वप्ना भालेराव आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी ही वेशभूषा डिझाइन केली होती.
निलेश जैन ऑनर ऑफ महाराष्ट्र ज्वेलर्सने आकुर्डी यांनी स्पर्धेतील विजेत्यांना सोन्याची नथ भेट दिली. तसेच को स्पॉन्सर प्रदीप बनसोडे यांनी शॉस दिले ,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा रुडे, शिवनाथ राठोड, तेजस जगदाळे,आकाश तांबे, राहूल शिंदे, अभय भोर, सुनिल हिरुळकर, दुर्गाताई भोर, मयूर काळभोर, स्वप्नाली ठाकूर, उपस्थित होते.
सपोर्टिंग पार्टनर मीनाक्षी पाटील, महेश गायकवाड, माधुरी जाईभाई, प्रविण सावंत, संतोष मुळे आणि रुपाली मुळे यांनी विशेष योगदान दिले.
शो ची फोटोग्राफी आणि विडियोग्राफी सैंडी बांगर, धर्मराज घोलप आणि साहिल पठाण यांनी केली होती. मेकअप आर्टिस्ट वर्दा मैम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धकांचे सौंदर्य फुलवले. तसेच
नम्या मॅगझीन आणि मराठी ९ न्यूज चॅनेल हे या शोचे मीडिया पार्टनर होते.
किट्स कॅटेगरीमध्ये मल्हार पाटिल, टीन कॅटेगरीमध्ये अनुशा जाधव, मिस्टर कॅटॅगेरीमध्ये अमित मुंडलिक,मिस कॅटॅगेरीमध्ये प्रिया खुळे, मिसेस कॅटॅगेरीमध्ये स्वाती सावंत हे स्लिक्स को. इन प्रस्तुत ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन २ या सौंदर्य स्पर्धेचे विजेते ठरले आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निलेश पापट यांनी केले होते.
मराठी ९ न्यूज या चॅनेलचे मुख्य संपादक शिवानंद राठोड आणि उपसंपादक सचिन उबाळेसर यांनी ग्लॅमर फॅशन आयकॉनच्या टीमचे आणि विजेत्यांचे मुलाखती घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.
