- कारेगाव प्रतिनिधी : अमोल कोहकडे
माईलस्टोन ज्ञानपीठ पुणे संचलित महेश सोनी इंटरनॅशनल स्कूलच्या कारेगाव शाखेमध्ये 78 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या प्रसंगी शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास आबा कोहकडे हे उपस्थित होते, त्यांनी या कार्यक्रमात,माइल स्टोन इंटरनॅशनल स्कूल मधील लहान मुलांची शिस्त आणि सादरीकरण पाहून या मुलाची शिस्त वाखानण्याजोगी असून मोठ्यांनाही लाजवेल अशी असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच संस्थेची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती पाहून आपण भारावून गेलो असल्याचे सांगत, शाळेच्या संपूर्ण स्टाफचे तोंड भरून कौतुकही केले.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुनील ओस्तवाल, उपाध्यक्ष विजय दुगड, प्रमुख पाहुणे म्हणुन विश्वास आबा कोहकडे, महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चाचे सचिव तुळशीदास दुंडे, प्रभारी गणेश ताठे, राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर आंबेगाव चे उपाध्यक्ष राहुल गवारे, मानव विकास परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मीनाताई गवारे, अल्पसंख्यांक अध्यक्ष दिलावर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष मनीषाताई टेंभेकर, पोलीस कॉन्स्टेबल अर्चना चौगुले, आदी मान्यवरांसह सन्माननीय पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व मुलांची प्रभात फेरी झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते भारतमाता प्रतिमापूजन व ध्वजपूजन केल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विश्वासआबा कोहकडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘माईलस्टोन’च्या संचालिका आणि प्रिन्सिपल सौ कांचन सोनवणे पाटील यांनी केल्यानंतर मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर मान्यवरांची भाषणे ही झाली.
उंच गगनात मुक्तपणे फडकणारा आपला तिरंगा भारतीय राष्ट्रध्वज, सकाळपासूनच सर्वत्र देशभक्तीपर गीतांनी दुमदुमलेले वातावरण आणि तीन रंगांची केलेली सजावट हे सर्व काही पाहून राष्ट्र अभिमानाने आपला ऊर भरून आल्याचे मत याप्रसंगी बोलताना मीनाताई गवारे यांनी व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा ताटे यांनी केले तर नम्रता पंचमुख यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
मुलांच्या खाऊ वाटपाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आल्याची माहिती माईलस्टोन एज्युकेशन नेटवर्कचे कार्यकारी संचालक राजाराम पाटील सोनवणे यांनी दिली.






Users Today : 4
Users Yesterday : 9