प्रतिनिधी : दत्तात्रय हिरामन कर्डिले.
शिरूर तालुक्यातील श्री.डि.एन ताठे विद्यालयाचे मुख्याध्यापक वाघमारे तुकाराम सर तसेच जेष्ठ शिक्षक सातपुते अरुण सर हे 31 जुलै 2024 रोजी नियत वयोमर्यादा नुसार सेवानिवृत्त झाले.
तसेच विद्यालयातील जेष्ठ शिक्षक थोरात सर हे सुद्धा नियत वयोमानानुसार 30 जून 2024 रोजी सेवनिवृत्त झाले.
त्या निमित्त 31 जुलै रोजी सेवापुर्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन कारेगाव मधील उद्योगपती व माजी ग्रामपंचायत सदस्य नवले जयप्रकाश यांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमा दरम्यान नवले यांनी विद्यालयाची पार्श्वभूमि व या 3 सत्कारमूर्ति यांनी विद्यालयासाठी दिलेले योगदान कसे होते हे शाळेतील विद्यार्थीवर्गाला सांगितले.
त्याच बरोबर अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी आप आपले मनोगत व्यक्त करत गुरु प्रति असलेले ऋण व्यक्त केले.
कार्यक्रमास अनेक माजी विद्यार्थी ही उपस्थित होते त्यांनी त्यांच्या मनोगतातून मुख्याध्यापक वाघमारे सर आणि जेष्ठ शिक्षक सातपुते सर,थोरात सर यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचे भविष्य उज्वल झाले आहे अशा सद्भावना व्यक्त केल्या.
यावेळी श्रीम.झावरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्रीम.कर्पे मॅडम यांनी सर्व शिक्षकांच्या वतीने सत्कारमूर्तिना त्यांच्या पुढील वाटचालिसाठी शुभेछ्या दिल्या.
सत्कारमूर्तिनी ही विद्यालयाच्या वतीने झालेल्या सत्काराचा स्विकार करुन विद्यालयाच्या भावी वाटचालीस सुयश चिंतले.
यानंतर वाघमारे सर यांनी मुख्याध्यापक पदाचा चार्ज अधिकृतपणे श्रीम.विमल झावरे यांच्याकडे सुपुर्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघमारे सर यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
तर खंदारे सर यांनी सर्वांचे आभार मानले.
