शिरुर-हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी संधी दिल्यास शिरुर-हवेली विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार आहे. तसेच त्या दृष्टीने शिरुर- हवेली तालुक्यातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील करत आहे.

पक्ष वाढीसाठी प्रत्येक गावात अजित पवार यांच्या विचारांचे शिलेदार तयार केले आहेत. असे वाघोलीचे माजी, उपसरपंच तथा पुणे महानगरपालिका स्वीकृत सदस्य शांताराम कटके म्हणाले.
रविवार (दि.२८ जुलै) शांताराम कटके शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व पत्रकारांसोबत सुसंवाद साधत मनमोकळ्या गप्पा गोष्टी केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहे. अजितदादांनी वेळोवेळी दिलेली जबाबदारी योग्य रित्या पार पडली आहे. महायुतीकडून शिरुर-हवेलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. पत्रकाराची किंमत ज्यांना कळते तेच राजकारणात सक्सेस आहेत. पत्रकार हे कोणाला मोठं करतील आणि कोणाला लहान करतील हे सध्या सांगता येत नाही.

राजकारण, समाजकारण करत असताना पत्रकारांची साथ असणे खूप महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने आज दोन्ही तालुक्यातील पत्रकारांची एकत्रित संवाद साधला आहे. पत्रकारांकडून आम्हा राजकारण्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळत असतात. पत्रकार हा एक आरसा आहे तो आपल्याला योग्य असा मार्ग दाखवत असतो. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या आधी पत्रकारांशी संवाद साधावा, या दृष्टीने आजही सुसंवाद बैठक घेण्यात आली. या बैठकीला मोठ्या प्रमाणात शिरुर-हवेलीतील पत्रकारांनी चांगला प्रतिसाद दिला.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते शांताराम कटके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सोमनाथ आव्हाळे, यांच्यासह शिरुर हवेली तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Users Today : 5
Users Yesterday : 9