उच्च व दर्जेदार शिक्षण हि काळाची गरज : देवदत्त निकम

Facebook
Twitter
WhatsApp

सरदवाडी प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले

अॅड. संग्राम नाथाभाऊ शेवाळे यांनी शिरूर तालुक्यामध्ये गेली आठ दिवसापासून चालू केलेल्या शिक्षण संवाद यात्रेचा पहिल्या टप्प्याचा समारोप कारेगाव येथील अक्षरनंदन ज्युनिअर कॉलेजमध्ये पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी नेते देवदत्त निकम व कार्यक्रमाचे अध्यक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे हे होते.

सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्च व चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध होण्यासाठी अॅड. संग्राम शेवाळे हे धडपड करीत आहेत. हे काम नवीं तरुण पिढी समोर एक आदर्श उभा करणारे असल्याचे प्रतिपादन शिरूर आंबेगाव राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम यांनी

केले.

भारतात व परदेशात नामांकित संस्थामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्याची अनेकांची इच्छा असते परंतू मार्गदर्शनाअभावी विद्यार्थी तिथपर्यंत पोहचत नाहीत. तसेच परदेशात सामान्य घरातील भारतीय विद्यार्थी खूपच कमी दिसून येतात. ग्रामीण भागात

माहितीचा अभाव,

पुरेसे मार्गदर्शन न मिळणे, आर्थिक अडचणी, आदींमुळे विद्यार्थ्यांत उच्च शिक्षणाबाबतचा निरुत्साह वाढत असल्याचे दिसून येते. सामान्य कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना देशातील व परदेशातील उच्च शिक्षणाची दारे खुली करण्याच्या मुख्य उद्देशाने आम्ही ‘शिक्षण यात्रेचे’ आयोजन करत असल्याचे ऍड. संग्रामसिंह नाथाभाऊ शेवाळे यांनी अक्षरनंदन ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांना

मार्गदर्शन करताना सांगितले.

हि शिक्षण यात्रा शिरूर तालुक्यात टाकळी हाजी, वडनेर खु, मलठन, कान्हूर मसाई, कवठे यमाई, पाबळ, रांजणगाव, करडे,सरदवाडी,शिरूर, करंदी वाघाळे, जातेगाव, निमगाव भोगी, न्हावरे, या महाविद्यालयात आठ दिवसात हि शिक्षण यात्रा पोहोचली.

या शिक्षण यात्रेत विद्यार्थांना मार्गदर्शन करताना चेवेनिंग शिष्यवृत्ती प्राप्त अॅड. दीपक चटप हे बोलताना म्हणले कि, शिक्षण संधीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी व देश-विदेशातील नामांकित विद्यापीठे, उच्च शिक्षणासाठी या परदेशी संस्था चेवेनिंग स्कॉलरशिप, कॉमनवेल्थ स्कॉलरशिप, इरॉसम मुंडूस स्कॉलरशिप या शिष्यवृत्ती बरोबरच राज्य व केंद्र सरकारच्या वतीनेही अनेक शिष्यवृत्ती योजना असुन यामधुन परदेशी शिक्षणासाठी संपूर्ण खर्चाची मदत होत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणात जाण्यासाठी मोठी संधी असल्याचे ऍड. दीपक चटप यांनी सांगितले.

तर जागतिक पातळीवर वाढलेल्या स्पर्धात्मक युगात सामर्थ्यवान राष्ट्र निर्माण करण्यासाठी तितकीच सक्षम आणि बुद्धिमान भारतीय तरुणांची फळी निर्माण होणार असल्याचा आत्मविश्वास अँड. बोधी रामटेक यांनी दिला.

यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, कारेगावचे माजी उपसरपंच सयाजी नवले, हनुमान सेवा सोसायटीचे माजी चेअरमन हरिभाऊ दौलतराव शेवाळे, राहुल गवारे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब नवले, माजी नगरसेवक रवींद्र धनक, स्वप्नील शेवाळे, कुमार नाणेकर, प्राचार्य स्नेहलता यादव, शुभम यादव,उपसरपंच राजेंद्र नवले,उद्योजक भारत नवले, उद्योजक शुभम शेवाळे, पालक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 1
Users Today : 5
Users Yesterday : 9