शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी शिक्षिकेचा नाविन्यपूर्ण प्रयोग

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:
महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांमधील शिक्षणाचे वैविध्यपूर्ण प्रयोग इतर शाळांनाही प्रेरणादायी व्हावेत, महाराष्ट्रातील शिक्षणातील असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम करणाऱ्या शिक्षकांच्या उपक्रमाला प्रसिद्धी देऊन इतर शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण हे त्रैमासिक सुरू केले आहे. महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका सौ. हर्षा बाळकृष्ण पिसाळ यांनी पुणे शहरातील डेक्कन येथे लक्ष्मणराव आपटे प्रशालेत काम करत असताना विद्यार्थ्यांसंदर्भात विविध उपक्रम राबवत असताना शिक्षकांसाठीही एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. तो म्हणजे शिक्षकांच्या शिक्षणाशी निगडित असणारे कविता, लेख संकलित करून त्याचे महाराष्ट्र शिक्षण नावाने सुंदर मासिक तयार केले आहे. विशेष म्हणजे अल्पावधीतच या मासिकाला महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश आणि परदेशातूनही मासिकासाठी लेख आलेले आहेत ही विशेष आनंदाची बाब आहे. लेखासोबत त्या संदर्भात काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा या ऑनलाइन मासिकामध्ये त्यांनी वाचकांच्या अधिक माहितीसाठी दिले आहेत. हे या मासिकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
एकच ध्यास !महाराष्ट्राच्या शिक्षणाचा विकास ! हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र शिक्षण ही शोध पत्रिका प्रकाशित केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास होण्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी ,प्रशासकीय अधिकारी वर्ग या सर्वांना जाणवलेल्या अडचणी व त्यावर त्यांनी कशी मात केली या संदर्भातील विविध विषयांवर उपक्रम व लेख ऑनलाइन प्रकाशित केले आहेत. लेख महाराष्ट्रभर वाचनासाठी उपलब्ध करून दिले आहे. या शैक्षणिक चळवळीमध्ये कृतीशील शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हर्षा पिसाळ यांनी केले आहे.
लेखनासाठी शालेय शिक्षणा संदर्भातील शालेय प्रवेशोत्सव, विद्यार्थ्यांचा पोषण आहार, गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम, मराठी भाषा संवर्धनासाठी उपक्रम, कला व संस्कृती विकासासाठी केलेले उपक्रम,शाळाबाह्य मुलांसाठी केलेले प्रयत्न,भारतीय कला कौशल्य विकसित करण्यासाठी राबवलेले उपक्रम,नवनवीन अध्यापन पद्धती, नवनवीन तंत्रज्ञान व शैक्षणिक साधनांचा कसा वापर करता येईल, विषयाबाबत गोडी निर्माण करण्यासाठी केलेले उपक्रम, इंग्रजी संभाषण कौशल्य विकासनासाठी केलेले उपक्रम, भाषण कौशल्य विकासनासाठी केलेले प्रयत्न, विद्यार्थ्यांची भावनिक साक्षरता,विद्यार्थ्यांची डिजिटल साक्षरता, शिक्षक विद्यार्थी पालक संवाद कसा असावा, शालेय शिस्त रुजवण्यासाठी केलेले उपक्रम, विद्यार्थ्यांमधे स्वयंशिस्त कशी रुजवावी, स्वावलंबी विद्यार्थी कसा घडवावा, वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवावा, स्त्री पुरुष समानता मूल्य विद्यार्थ्यांमध्ये कसे रुजवावे, सादरीकरण कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये कसे विकसित करता येईल, एकविसाव्या शतकातील आवश्यक कौशल्य विकसन,भारतीय ज्ञान प्रणाली, भारतातील समृद्ध शैक्षणिक वारशाची रुजवणूक,राष्ट्रीय एकात्मतेसाठी राबवलेले उपक्रम,विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती कशी रुजवता येईल असे विषय असणार आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 1
Users Today : 5
Users Yesterday : 9