पुण्यातील निवडुंग विठोबा मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते आरती संपन्न

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी: सागर पवार
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दि. १७ जुलै रोजी पुण्यात श्री. विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

पुण्यात गणेश पेठेतील निवडुंग विठोबा मंदिर येथे आज आषाढी एकादशी निमित्त डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री,लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत कुशल मार्गदर्शनात या वर्षीची आषाढी एकादशी हर्षोल्लासात साजरी होत असून, पुण्यात देखील डॉ. गोऱ्हे यांच्यासह शिवसैनिकांनी आषाढी एकादशी मनोभावे साजरी केली.

महायुती शेतकऱ्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी, सामान्य कामगारांसाठी जे काम करत आहे. ते काम अधिक करण्यासाठी बळ मिळो अशी भावना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली .नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाल्याबद्दल व शिवसेनेचे आठ खासदार निवडून आल्याबद्दल पांडुरंगाचे आशीर्वाद निवडणुकीत आम्हाला मिळाले अशी भावना डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

तसेच, मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजिदादा पवार जे महाराष्ट्रात विकासाच काम करतायेत त्यासाठी त्यांना आशीर्वाद द्यावा याच्याबद्दल विठुरायाकडे प्रार्थना यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली, अशी भावना यावेळी माध्यमांशी बोलताना डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

यावेळी नाना भानगिरे ( शहर प्रमुख )
विशाल धनवडे (माजी नगरसेवक) सुदर्शना त्रिगुणाई ( सहसंपर्कप्रमुख ) श्रद्धा शिंदे ( महिला शहर प्रमुख )युवराज शिंगाडे, धनंजय जाधव, गणेश काची,सुधीर जोशी यांच्यासह महिला,पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 2
Users Today : 6
Users Yesterday : 9