शिरूर प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे ट्रैफिक जाम हा रोजचा विषय झाला आहे, ट्रॅफिक कमी होण्यासाठी व अपघात होऊ नये म्हणून , स्पीड ब्रेकर बसवले असताना, सर्व उलट होताना दिसते आहे.ट्रॅफिक कमी न होता वाढले आहे.
त्यामुळे लोकवस्तिला धोका निर्माण झाला.
रस्ता क्रॉस करण्यास अडथळा होत आहेच, शिवाय वयोरुद्ध लोकांना हॉर्न आणि स्पीड ब्रेकर ला गाड़ी आपटल्या मुळे होणारा मोठा आवाज नाहक सहन करावा लागत आहे, वयोरुद्ध आणि लहान मुलांना याचा जास्त त्रास होत आहे.याच स्पीड ब्रेकर मुळे बेसिस्त गाड़ी चालवण्याची संख्या वाढत आहे.यामुळे रोड साईडला असणार्या हॉटेल व पायी चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
काही दिवांपूर्वीच एक कंटेनर सलून मध्ये घुसला होता, तेव्हा काही जीवितहानी हानी झाली नाही, अन्यथा यास कोण जबाबदार धरले असते?
शिवाय यात शाळेसाठी रोड क्रॉस करणाऱ्या मुले ही आहेत व त्यांच्या जीवाशी सरदवाडी ग्रामपंचायत, प्रशासन ,PWD खेळ खेळत आहे का ? काही दिवसांपू्वीच सणसवाडी येथिल उपसरपंच हे ही रोड शेजारी पायी चालत असताना अपघातात दगावले आहेत , सरदवाडी मध्ये तर एका शेजारी एक असे अनेक स्पीड ब्रेकर बसवल्यामुळे व गाडी त्यावर अपटू नये म्हणून , अनेक छोट्या मोठ्या गाड्या रोडच्या खाली उतरताना दिसतात. ज्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वाढत आहे.
वास्तविक या ठिकाणी स्पीड ब्रेकर ऐवजी, सिग्नल बसवणे फार गरजेचे व महत्वचे आहे. त्यामुळे वाहनाची गर्दी होणार नाही व काही काळ वाहने ऐका ऐका साईडला थांबल्या मुळे नागरिक, मुले यांना रोड क्रॉस करताना त्रास होणार नाही.
सरदवाडी मध्ये रोज एक ना एक गंभीर अपघात होताना दिसत आहेत.
यात चूक नसतानी गाड्यांचे ही नुकसान होत आहे







Users Today : 8
Users Yesterday : 9