पालखी सोहोळा निर्विघ्न पार पडावा आणि वारकऱ्यांची प्रकृती उत्तम रहावी – ना. मुरलीधर मोहोळ.

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी: सागर पवार

विश्वास आधार स्वयंरोजगार संस्था आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे वारकऱ्यांसाठी औषध पेटी वाटप उपक्रम .

पालखी सोहोळा निर्विघ्न पार पडावा आणि वारी दरम्यान सर्व वारकऱ्यांची प्रकृती उत्तम रहावी हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना असल्याचे केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ म्हणाले.
विश्वास आधार स्वयंरोजगार संस्था आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने आरोग्यदायी वारी साठी औषध पेटी वाटप उपक्रमाच्या वेळी ते बोलत होते.
वारी दरम्यान कोणी आजारीच पडू नये पण वेळ पडल्यास सर्व प्रकारची औषधं असलेल्या प्रथमोपचार पेटी चा उपक्रम स्तुत्य असल्याचेही ते म्हणाले.
भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे,प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या हस्ते काही वारकऱ्यांना संत तुकाराम पादुका चौकात वाटप करण्यात आले.

यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वास आधार संस्थेचे विजय सरोदे, क्रिएटिव्ह च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, कल्याणी खर्डेकर, विश्वास आधार चे राहुल जानवेकर, नागनाथ जानवेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
ह्या औषध पेटी मध्ये थंडी, ताप, खोकल्याची औषधें,इचगार्ड, बँड-एड, जखमेवर मलम, अंगदुखी चे मलम, ओ आर एस,यासह इतर औषधाचा समावेश आहे.
डॉ.सचिन जाधव व डॉ. अजय शिंदे यांच्या सल्ल्यानुसार ही औषधीपेटी तयार करण्यात आली असून याचे विविध ठिकाणी वारकऱ्यांना वाटप करण्यात आले.
ह्या औषध पेटीची गरज पडू नये अशीच आमची प्रार्थना आहे पण अचानक कोणास काही झाल्यास डॉक्टर उपलब्ध होईपर्यंत प्रथमोपचार करता यावा यासाठी ही पेटी उपयुक्त ठरेल असे विजय सरोदे व राहुल जानवेकर म्हणाले.
नितीन धनगर, संदीप भिसे, प्रतीक सरोदे, उमेश कांबळे, सचिन पुटोल, मंगेश सोनावणे, सागर जाना, विनोद सोनावणे, प्रथमेश हिंगे, सागर पुजारी, हर्ष सरोदे यांनी ह्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 4
Users Today : 8
Users Yesterday : 9