एमएनजीएलचा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प…

Facebook
Twitter
WhatsApp

 चिखलीमध्ये पाच हजार वृक्षारोपण

मानवी जीवनात झाडांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे आपल्या सभोवताली वृक्ष वनराई असणं आवश्यक असते. त्याचेच महत्व ओळखून एमएनजीएलने आपले सामाजिक दायित्व राखून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला असून, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने 20 जून 2024 रोजी RTO Ground, चिखली, PCMC येथे 5000 हून अधिक झाडे लावली. हा हरित उपक्रम MNGL च्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत आरोग्य जनकल्याण संस्थेच्या सहयोगाने राबविण्यात आला.

यावेळी MNGL च्या स्वतंत्र संचालिका बागेश्री मंठाळकर, Managing Director- कुमार शंकरजी, Director Commercial-संजय शर्मा यांच्यासह वाहतूक शाखेचे Regional Transport Officer-PCMC- संदेश चव्हाण , निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक निरिक्षक सुरेश आव्हाड, राहुल जाधव, प्रकाश मुळे यांच्या सह एमएनजीएलचे सर्व प्रमुख अधिकार आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी एमएनजीएलच्या स्वतंत्र संचालिका बागेश्री मंठाळकर म्हणाल्या की, दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने झाडे लावली पाहिजेत व ती झाडे जगवली पाहिजेत. त्यामुळे च एमएनजीएलनेही आपले सामाजिक दायित्व राखण्यासाठी आज पाच हजार वृक्षारोपणाचा संकल्प पूर्ण केला आहे. भविष्यातही वृक्षसंवर्धनाच्या कार्यात एमएनजीएलचा सक्रीय सहभाग असेल, असा विश्वास व्यक्त केला.

संचालक कुमार शंकरजी म्हणाले की, एमएनजीएल सामाजिक दायित्व राखून नेहमीच कार्यरत असते. आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात नेहमीच कार्यरत आहे. आजच्या घडीला पर्यावरण संवर्धन देखील अतिशय महत्त्वाचे झाल्याने, पर्यावरण संवर्धनासाठी ही एमएनजीएलने पुढाकार घेतला आहे. आगामी काळात ही असे उपक्रम राबविण्यासाठी एमएनजीएल कटिबद्ध असेल, अशी ग्वाही दिली. त्यांच्या उत्साहाची प्रतिध्वनी श्री. संजय शर्मा यांनी व्यक्त केली, “हा उपक्रम केवळ PCMC ची जैवविविधता वाढवत नाही, तर निसर्गाशी असलेले आपले नातेही मजबूत करते.”

यावेळी वाहतूक शाखेचे निरीक्षक सुरेश आव्हाड, यांनी एमएनजीएलच्या पुढाकाराचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. यांनी RTO मध्ये विविध वृक्षारोपण inititives बद्दल सांगितले,त्यांनी वृक्षारोपणासोबतच त्यांची वाढ होताना काळजी घेणे हेही तितकेच महत्वाचे आहे हे पटवून सांगितले .. तसेच MNGL सोबत असेच हरित उपक्रम पुढेही करायला आवडतील असे सांगितले.

प्रकाश मुळे, यांनी आपण आपल्या पुढच्या generation sathi काय द्याच असेल तर तर ते आपण त्यांना -Clean water, clean air, clean food देउया, असा संदेश दिला. MNGL पुढच्या पिढ्यांसाठी हिरवेगार, आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या समर्पणाची पुष्टी करते, असेही त्यांनी नमूद केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 5
Users Today : 9
Users Yesterday : 9