एमएनजीएलचा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प…

 चिखलीमध्ये पाच हजार वृक्षारोपण

मानवी जीवनात झाडांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे आपल्या सभोवताली वृक्ष वनराई असणं आवश्यक असते. त्याचेच महत्व ओळखून एमएनजीएलने आपले सामाजिक दायित्व राखून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला असून, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने 20 जून 2024 रोजी RTO Ground, चिखली, PCMC येथे 5000 हून अधिक झाडे लावली. हा हरित उपक्रम MNGL च्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत आरोग्य जनकल्याण संस्थेच्या सहयोगाने राबविण्यात आला.

यावेळी MNGL च्या स्वतंत्र संचालिका बागेश्री मंठाळकर, Managing Director- कुमार शंकरजी, Director Commercial-संजय शर्मा यांच्यासह वाहतूक शाखेचे Regional Transport Officer-PCMC- संदेश चव्हाण , निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक निरिक्षक सुरेश आव्हाड, राहुल जाधव, प्रकाश मुळे यांच्या सह एमएनजीएलचे सर्व प्रमुख अधिकार आणि कर्मचारी उपस्थित होते.

Read more