शिरूर प्रतिनिधी :—
शिरूर तालुक्यातील नावाजलेली शाळा म्हणजे विद्याधाम प्रशाला, या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक, काय काय प्रयत्न करतात, ते त्यांना माहिती असते.
विद्याधाम प्राथमिक शाळेची तर मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आलेले असताना , मोठ्या प्रमाणात ऍडमिशन करून घेण्यात आले आहे. या प्राथमिक शाळेची फी हि लहान गटाला जास्त, तर नंतर कमी कमी होत जाते. याचा अर्थ काय असू शकतो हे आज पर्यंत कोड्यात आहे.
विद्याधाम अशी शाळा आहे की जिथे क्रीडांगण ना , पार्किंग , मुलांच्या गाड्या शिक्षकांच्या व पालकांच्या गाड्या पार करण्यासाठी कुठलेही पार्किंग नाही. मुलांना पिटीच्या तासा साठी कुठलेही क्रीडांगण नसल्यामुळे मुलं फक्त वर्गातच बसून लंगडी, खोखो यासारखे पीटीचे तास असतात याची मज्जा घेतात की काय आहे प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्याधाम प्रशालेने बीजे कॉर्नर साईडला बांधलेली भिंत हि पूर्ण पणे अतिक्रमण असून ही क्रीडांगण वाढू शकली नाही हे विशेष,होते त्या जागेवर, ब्लॉक टाकत आहे ते क्रीडांगण सुद्धा संपवून टाकले आहे.
रोज 12 वाजता या शाळेत प्राथमिक शाळेतील लहान गट व मोठा गट सुटण्याची वेळ व पहिली ते चौथी भरण्याची वेळ, विद्याधाम प्रशालीची पाचवी ते सातवी सुटण्याची वेळ व आठवी ते दहावी भरण्याची वेळ व अकरावी बारावी कॉलेज सुटण्याची वेळ ही एकच असल्यामुळे शाळेत अक्षरशः कोंडवाड्यात मुले पाठवल्याचे चित्र दिसत असते व त्यात भर पडतात पालक ,मुलांना घेण्यासाठी येणारे .येणारा पालक आपली दुचाकी शाळेला पार्किंग नसल्यामुळे बीजे कॉर्नर रोडला वाटेल तसे सोडून आत मध्ये मुलांना आणण्यासाठी जातो, त्यामुळे रोडवर त्यावेळेस चार चाकी गाड्या,एसटी महामंडळ बसेस व अन्य मोठे वाहने चालवताना वाहन चालकांना नाहक त्रासाला झाला सामोरे जावे लागते.
पालकांच्या या बेजबाबदार वाहन पार्किंग केल्यामुळे भविष्यात काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे?
विद्याधाम प्रशाला ही फक्त ऍडमिशन देत , तुकड्या वाढवत येऊ द्या, येऊ द्या बस ऐवढेच करताना दिसते आहे.
पण बाकीच्या सुविधा कोण देणार ? यासाठी आवाज कोण उठवणार ? की फक्त पोलिस प्रशासनाला दोष दिले की संपले ? पोलिस आहेत म्हणुन तरी थोड्या फार प्रमाणात शिस्त दिसते नाही तर , एखाद्याचा जीव जात नाही तोपर्यंत या शाळेतील मुख्याध्यापक व संचालकांना जाग येणार नाही, असे चित्र दिसते आहे.

विद्याधाम शाळेशेजारी रामलिंग ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय असल्यामुळे त्यांनी त्यांच्या जागेवर कंपाऊंड मारल्यामुळे शाळेत आत जाण्यासाठी जागा ही अपूर्ण पडत आहे. त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या व ग्रामस्थांच्या गाड्या ते आत मध्ये पार्किंग करून घेतात, त्यामुळे त्यांच्या गाड्या मुळे त्रास होत नाही.
विद्याधाम प्राथमिक शाळेचे पाठीमागे असणाऱ्या प्रवेशद्वाराचा उपयोग बंद केल्यामुळे बाहेर येण्यासाठी एकच प्रवेशद्वार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शाळेतून बाहेर येताना व आत जाताना कोंडी होते. शिवाय एकदम सुटणाऱ्या व भरणाऱ्या शाळेमुळे रोजच ट्राफिकचा प्रश्न हा फक्त आणी फक्त विद्याधाम प्रशालेमुळे निर्माण होत आहे.
यामध्ये पोलीस प्रशासन जीव ओतून प्रयत्न करून ही बेसिस्त पालकांमुळे , विद्याधाम प्रशालामुळे नागरिक फक्त पोलीस प्रशासनाला दोष देताना दिसतात.






Users Today : 9
Users Yesterday : 9