जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड विद्यापीठात ग्रीन इनोव्हेटिव्ह क्लबचे उद्घाटन

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी: सागर पवार

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयु) ग्रीन इनोव्हेटिव्ह क्लबचे उद्घाटन करण्यात आले. या क्लबचा उद्देश महाविद्यालय परिसरात आणि समाजात पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि जागरूकता यांना या उपक्रमात प्रोत्साहन दिले जाईल अशी माहिती पीसीसीओईचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी दिली. यावेळी पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, पीसीईटी संचलित सर्व शाळांचे प्रमुख, प्राध्यापक सदस्य, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
वाढत्या प्रदूषणामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने पीसीयुने ग्रीन इनोव्हेटिव्ह क्लबच्या स्थापनेतील पुढाकाराचे कौतुक केले. पर्यावरणीय शाश्वतता आणि जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शिकण्याचे आणि नवकल्पनेचे केंद्र म्हणून, विद्यापीठांनी पर्यावरणास अनुकूल असलेल्या अभ्यासांना प्रोत्साहन देऊन नवा आदर्श निर्माण करण्याची अनोखी संधी आहे, असे डॉ. मणीमाला पुरी यांनी सांगितले.
पर्यावरणीय मुद्द्यांवरील कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन करणे, शाश्वतता अभ्यासांवरील जागरूकता मोहीम राबविणे, विद्यापीठ परिसरात हरित प्रकल्प जसे वृक्षारोपण अभियान, कचरा कमी करण्याच्या उपक्रम, ऊर्जा बचत कार्यक्रम सुरू करणे, विद्यार्थ्यांना पर्यावरणीय आव्हानांसाठी नवकल्पना उपाय विकसित करण्यास प्रोत्साहित करणे हे ग्रीन इनोव्हेटिव्ह क्लबचे मुख्य उद्देश आहेत असे डॉ. सुदीप थेपडे यांनी सांगितले.
ग्रीन इनोव्हेटिव्ह क्लबच्या प्रभारी डॉ. अंजू बाला यांनी क्लबचे लोगोचे अनावरण केले. त्यांनी आगामी उपक्रमांबाबत संक्षिप्त सादरीकरण केले. सदस्य सचिव डॉ. नीरू मलिक आणि क्लबचे सदस्य विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 5
Users Today : 9
Users Yesterday : 9