पुणे प्रतिनिधी: सागर पवार
पुणे अर्थोपेडीक सोसायटीच्या वतीने डॉ विलास जोग यांना त्यांच्या उतुंग कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल,श्रीफळ,पुष्प गुच्छ,पुणेरी पगडी व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
महात्मा सोसायटी आशिष बंगला या त्यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पुणे अर्थोपेडीक सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अर्जुन वेगस, सचिव योगेश खंडाळकर, माजी सचिव डॉ.नारायण कर्णे, डॉ.अरविंद भावे, डॉ.जगदीश पानसे, डॉ.गोवर्धन इंगळे, जयंतीलाल तलेसरा, डॉ.विलास जोग यांच्या पत्नी डॉ.स्मिता जोग.आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ विलास जोग(वय ७४)यांनी बीजे मेडिकल कॉलेज मध्ये प्राध्यापक, अस्थीशस्त्रक्रिया,देश परदेशात मोफत पोलिओ रुग्ण शस्त्रक्रिया. आदींसाठी जीवनभर कार्य केले. या कार्यासाठी पुणे अर्थोपेडीक सोसायटी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देत आहे असे अध्यक्ष डॉ.अर्जुन वेगस यांनी नमूद केले.






Users Today : 9
Users Yesterday : 9