सरदवाडी प्रतिनिधी: दतात्रय कर्डिले
सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्याकडून बाभुळसर बु येथील मयुर किरण यादव शिरूर तालुक्यात प्रथम आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
मयूर हा मांडवगण फराटा येथील वाघेश्वर विद्याधाम प्रशाला माध्यमिक विद्यालय येथे एसएससी परीक्षेत शिरूर विभागात प्रथम आला आहे ,या यशस्वी विद्यार्थ्यांने तालुकास्तरावर कौतुकाची थाप पडली असून प्रशालेचं व बाभुळसर बु. गावाचं नाव उज्वल केले आहे.
प्रशालेचा निकाल ९६.८३℅ लागला असून विद्यालयाचे प्राचार्य रामदास चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशालेतील २२१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी २१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत .तसेच प्रथम क्रमांक मयूर किरण यादव याला ९७.४०℅, दुसरा क्रमांक विराज नवनाथ कोंडे ९५℅ ,श्रावणी जालिंदर फराटे ९४.४०% ,सिद्धी संपत फराटे ८३.८०℅ ,यशराज सचिन गरुड ९३℅ व तेजस विजय फराटे ९३℅ असे गुण मिळाले आहेत.
तरी या सर्व विद्यार्थ्यांचे पंचक्रोशी मधून कौतुक होत आहे. तसेच शिरूर विभागात प्रथम क्रमांक येणाऱ्या मयूर किरण यादव यांचे बाभुळसर बु चे सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .यावेळी बाभुळसर बु वि का संस्थेचे संचालक सचिन नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेंद्र नागवडे ,सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ नागवडे, पालक राजेंद्र यादव, किरण यादव ,वैशाली यादव, वर्षा यादव,पत्रकार अल्लाउद्दीन अलवी आदी उपस्थित होते.
यावेळी सरपंच दीपाली ताई नागवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सर्वसामान्य कुटुंबातील मयूर किरण यादव यांनी शिरूर तालुक्यात एस एम सी मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल, आपल्या बाभुळसर बु. गावचे नाव तालुक्याचे पटलावर आणण्याचे काम केले असून ,त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा ही त्यांनी दिल्या.
तसेच सरस्वती क्लासेस मांडवगण फराटामध्ये चांगल्या प्रकारे पूर्व परीक्षा तयारी घेऊन विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळवून देण्यास सरस्वती क्लासेसचा मोलाचा वाटा आहे .तरी सर्व क्लास स्टापचे यावेळी सरपंच दिपालीताईं यांनी अभिनंदन केले आहे. तसेच बाकी सर्व वाघेश्वर विद्यालय प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे व पद्मश्री आप्पासाहेब पवार विद्यालय मधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
