पुणे प्रतिनिधी सागर पवार.
पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा ४८ वा वर्धापन दिन संपन्न झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील,उपाध्यक्ष प्रदीप तुपे,संजय गांधी,प्रमुख पाहुणे इंद्रनील चितळे (मॅनेजिंग डायरेक्टर चितळे बंधू),चंद्रशेखर चिंचोलकर(डायरेक्टर सीईएस इंडिया प्रा.लि.),दिनानाथ खोलकर(इंडिपेंन्डन्ट डायरेक्टर),आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्कृष्ट्र कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बाळ पाटील यांनी पीएमएच्या कार्याची माहिती दिली,इंद्रनील चितळे यांनी भारतात खाद्य हे वस्तू नसून संस्कृतीचा एक भाग असल्याचे प्रतिपादन केले.चंद्रशेखर चिंचोलकर यांनी देशाच्या आर्थिक संधी बाबत विवेचन केले.दिनानाथ खोलकर यांनी उद्योग वाढीसाठी आवश्यक बाबी विषयी मार्गदर्शन केले.
प्रदीप तुपे उपाध्यक्ष यांनी स्वागत केले,तर आभार प्रदर्शन संजय गांधी उपाध्यक्ष यांनी केले






Users Today : 1
Users Yesterday : 9