अकलूज येथील प्रचार सभेत दौलत नाना शितोळे व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित…

Facebook
Twitter
WhatsApp

दिनांक 28 एप्रिल 2024 रोजीअकलूज येथे माढा लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह दादा निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूज या ठिकाणी जाहीर सभा संपन्न झाली.

यावेळी या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रशांत परिचारक मालक,चेतन केदार ,आमदार जयकुमार गोरे,श्रीकांत देशमुख

व महायुतीचे घटक पक्ष, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमाच्या वेळी रामोशी बेडर, बेरड समाजाचे नेतृत्व करणारे व जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे हे हि उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून आपल्या समजाची जवळ जवळ दोन लाख मतदान आहे व ते महायुती सरकारला मिळवून देण्याची ग्वाही दिली. कारण आमचा समाज असा आहे तो कोणाचीही उपकार फेडल्याशिवाय राहत नाही व केलेले उपकार विसरतही नाही. स्वातंत्र्य पूर्व काळापासून आमच्या असणाऱ्या मागण्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्यापैकी पूर्ण केलेल्या आहेत व ते आम्ही विसरलो नाही त्यामुळे आम्ही पूर्ण समाज महायुतीला पाठिंबा देत निवडून देऊ असे आश्वासन दौलत नाना शितोळे यांनी, अकलूज येथील महायुतीचे खासदार रणजीत सिंग दादा निंबाळकर यांच्या प्रचाराच्या कार्यक्रमात दिले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 8
Users Today : 12
Users Yesterday : 9