शिरूर प्रतिनिधी :—
पुणे जिल्हा मा.पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर बाभुळसर बू!ते मारुती शंकर नागवडे ना वस्ती,जगताप पाटी रस्ता करणे ३०लक्ष रुपये निधी रस्त्याचे अतिशय उत्तम प्रकारचे काम सदलागव येथील शितोळे कॉन्ट्रॅक्टर यांच्या मार्फत करण्यात आले .
जगतापवाडीतील आयुष जगताप राज्यात चौथा…
सदर काम करीत असताना त्या कामाची गुणवत्ता तपासून ते अधिक मजबूत कसे होईल याची पाहणी करताना सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे,प्रगतशील शेतकरी संतोष टेकवडे,महेंद्र नागवडे मा.उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सतीश नागवडे अध्यक्ष सोशल मीडिया शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,अमित नागवडे,युवक कार्यकर्ते आबासाहेब कुदळे,पत्रकार आलुद्दिन अल्वी उपस्थित होते.
यावेळी सरपंच दिपाली नागवडे म्हणाल्या आमचे गाव छोटे असल्या कारणाने निधी कमी प्रमाणत येतो, परंतु आलेला निधीमधून होणारे काम हे दर्जेदार कसे होईल याकडे आमचे लक्ष असून ते काम जास्तीत जास्त मजबूत होऊन तो रस्ता जास्त काळ टिकावा ,म्हणून आम्ही स्वतः जातीने लक्ष घालत असतो कारण रस्त्याला वारंवार निधी उपलब्ध होत नाही.
यावेळी कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा केली असता लवकरच साईट पट्टीला मुरूम टाकून रस्त्याचे काम पूर्ण करणार आहे असे त्यांनी सांगितले.
