श्री दुर्गामाता दौड : भक्ती, उत्साह, ऐक्य आणि राष्ट्रीय संकल्पाचा सोहळा

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:चेतन पाटील
वडगावशेरी, चंदननगर, खराडी विभागात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे नवरात्रोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेली श्री दुर्गामाता दौड यावर्षी मोठ्या भक्तिभावात, उत्साहात आणि ऐक्यभावनेत पार पडली.

गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर गावागावांत, शहरात, नगरात, तालुक्यात व जिल्ह्यात ही पवित्र दौड काढण्यात आली. त्या परंपरेत वडगावशेरी, चंदननगर व खराडी विभागानेही सलग दहा दिवसांत या दौडींचे आयोजन करून मातृशक्तीची उपासना आणि हिंदवी स्वराज्याचा जागर घडविला.

 

नवरात्रातील दहा दिवस दौडींची परंपरा::

अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच घटस्थापना ते विजयादशमी दसरा या दहा दिवसांत वडगावशेरी, चंदननगर, खराडी, थिटे वस्ती, साईनाथ नगर, सोमनाथ नगर, तुळजाभवानी नगर, आपले घर सोसायटी, खराडी बायपास अशा विविध भागातून श्री दुर्गामाता दौड निघाली.

या सर्व दौडींचा कळस गाठला तो दहाव्या दिवशी काढलेल्या श्री दुर्गामाता महादौडीने. या महादौडीत परिसरातील नागरिक, धारकरी, माता-भगिनी, लहान मुलं-मुली यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

 

परम पवित्र भगव्या ध्वजाच्या नेतृत्वात दौड:

परम पवित्र भगवा ध्वज अग्रस्थानी, तो घेऊन पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवत दौड निघते. ध्वजामागे शस्त्रधारी, त्यामागे समस्त धारकरी असा हा सळसळत्या जोशाचा सोहळा ठरतो.

“भारत माता दुर्गामाता एक हे”, “भारत माता गोमाता एक हे” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे गीत, देशभक्तीपर गीते, प्रेरणामंत्र व ध्येयमंत्र यांच्या घोषणांनी प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक भारावून गेला.

 

ऐक्याची परंपरा:

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे वडगावशेरी, चंदननगर व खराडी विभागातील ऐक्यभावना.
येथील प्रत्येक उपक्रम हा सर्व हिंदुत्ववादी संघटना व संस्था एकत्र येऊनच पार पाडतात, हीच या भागाची खरी ओळख आहे. श्री दुर्गामाता दौडीतही अनेक हिंदुत्ववादी संघटना व संस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

 

राष्ट्रीय सण होण्याची आकांक्षा:

श्री दुर्गामाता दौड ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरा न राहता आता राष्ट्रीय सणाच्या स्वरूपात साजरी व्हावी, हा ठाम संकल्प समस्त धारकरी व सर्व समाजमनात दिसून येतो.
यासाठी सर्वजण प्रयत्नशील असून, भावी पिढ्यांसाठी हा उपक्रम देशभरात जागृती निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सर्वांना शतशः आभार:

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वडगावशेरी, चंदननगर, खराडी विभाग तर्फे या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व धारकरी बंधू-भगिनींना, नागरिकांना तसेच विविध संघटनांना मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
तसेच पोलिस प्रशासन यांनी देखील चांगले सहकार्य केले त्यांचे देखील धन्यवाद देण्यात आले असे तेथील स्थानिक धारकरी सांगतात.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 5 5 2 9 9
Users Today : 7
Users Yesterday : 22