सरदवाडी प्रतिनिधी : दत्तात्रय हिरामण कर्डिले.
संदीप किसन सरोदे सर यांचा गौरव म्हणजे शिरूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे . अभिनव विद्यालय सरदवाडी येथील आदर्श व उपक्रमशील शिक्षक संदीप किसनराव सरोदे यांना पंडीत दीनदयाळ विद्यापीठ, यांच्यावतीने “मानद डॉक्टरेट पदवी” नुकतीच जाहीर झाली आहे.
उपक्रमशील कार्याचा ठसा
संदीप सरोदे यांनी गेल्या अनेक वर्षांत शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागात शिक्षणाचे महत्त्व पोहोचविणे, शैक्षणिक प्रक्रियेत सुधारणा करणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे , शिष्यवृत्तीच्या माध्यमातून गुणवत्ता वाढविणे,तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे अशा अनेक त्यांच्या उपक्रमांची मोठी दखल घेतली गेली आहे.
नवी दिल्ली येथे बहाल होणार सन्मान
या मानद डॉक्टरेट पदवीचा बहुमान येत्या २६ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे आयोजित भव्य कार्यक्रमात संदीप सरोदे यांना बहाल करण्यात येणार आहे.
या घोषणेनंतर शिरूर तालुका तसेच सरदवाडी परिसरात उत्साहाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल विविध मान्यवरांनी संदीप सरोदे सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
शिरूर तालुक्याचे मा. आमदार तथा श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव म्हाळुंगी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत (काका) पलांडे यांनी म्हटले की, “हा सन्मान हा केवळ सरोदे सरांचा नसून ,शिक्षण क्षेत्राचा गौरव आहे,संपूर्ण शिरूर तालुक्याचा अभिमान आहे.”
माजी सभापती शशिकांतभाऊ दसगुडे यांनी गौरवोद्गार काढले की, “विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नवनवीन प्रयोग करणारे संदीप सरोदे सर हे खरे प्रेरणास्थान आहेत.”
मा,जि.प.सदस्य शेखरदादा पाचुंकर पा म्हणाले की “ शिक्षण क्षेत्रातील हा खूप मोठा गौरव आहे, संदीप सरोदे सरांच्या कार्याचा हा गौरव नक्कीच प्रेरणा देणारा आहे”
आमदाबादचे सरपंच राजेंद्र शिंदे म्हणाले “शिष्यवृत्ती च्या माध्यमातून सतत विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी सरांची तळमळ असते , ही पदवी म्हणजे चांगल्या कार्याचे कौतुकच आहे “
पिंप्रीचे सरपंच शरदभाऊ खळदकर, म्हणाले “असे आदर्शवृत्त काम करणारे कार्यकुशल शिक्षक हेच एक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आणि त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारे असतात,”
या पुरकाराबद्दल राळेगण थेरपाळचे सरपंच
पंकजदादा कारखिले, सरदवाडीच्या सरपंच सौ.लक्ष्मीताई जाधव,कर्डेलवाडिच्या सरपंच सौ लताताई कर्डिले सरपंच विलास कर्डिले , करंजावनेचे उपसरपंच श्रीरामबापू शेलार,युवा उद्योजक संग्रामभैय्या कांडेकर,मा.उपसरपंच गणेशदादा सरोदे,युवा उद्योजक दत्तात्रय कुंडलिक सरोदे, दिपक सरोदे, ग्रामपंचायत सदस्य उमेशदादा सरोदे ,सौ.विद्याताई सरोदे,शिक्षक नेते दादासाहेब गवारे सर अक्षय कांडेकर,मा. मुख्याध्यापक अरुण गोरडे सर अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक शांताराम खामकर सर, हंबीरराव लंघे सर,प्रा.अशोकराव कारखिले सर, दत्तात्त्रय कर्डिले सर मा.कृषी सहायक हनुमंत सरोदे,निलम दत्तात्रय सरोदे(माजी.ग्रा.उपसरपंच),विक्रम अण्णा सरोदे,नामदेव दादा सरोदे(माजी.ग्रा.सरपंच) युवा उद्योजक तुषार गायकवाड, संदीप बोचरे, युवा उद्योजक किरण सरोदे तसेच शिरूर तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षक वर्गाने आणि सरदवाडी ग्रामस्थांनी सरांचे अभिनंदन व कौतुक केले.
तालुक्याचा गौरव:
या सन्मानामुळे सरदवाडी व शिरूर तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राला नवे उंचीमान प्राप्त झाले असून ग्रामीण शिक्षकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
संदीप किसनराव सरोदे सर यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल बोलताना ते म्हणाले
“हा मानद डॉक्टरेट सन्मान मिळाल्याबद्दल मी अत्यंत आनंदित आणि कृतज्ञ आहे. माझ्या शालेय जीवनातील जडणघडणीत माझे मार्गदर्शक व ,माझे गुरु माझे आदर्श शिक्षक, वडील कै.किसनराव सरोदे गुरुजी,आई कांताबाई सरोदे तसेच भाऊ कै.राजेंद्र सरोदे ,न्यू इंग्लिश स्कूल शिरूर या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून आदर्श काम करणारे बंधू श्री अण्णासाहेब सरोदे सर, माझी पत्नी शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका सौ संगीता सरोदे , विद्यालयातील शिक्षक, सहकारी, विद्यार्थी आणि समाजातील प्रत्येक व्यक्तींच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते.
माझे कार्य नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक बांधिलकी साकारण्यासाठी राहिले आहे. ही मान्यता मला आणखी प्रेरणा देते की, शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यातून समाजासाठी काहीतरी उपयुक्त योगदान देत राहावे.”
