शिरूर प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यातील सर्वात मोठ्या प्रमाणात आर्थिक मोहमाया प्रशासनाला गोळा करून देणारा उघोग चालू वर्षात लवकर सुरू झाला आहे.
त्यामुळे पोलीस प्रशासन व तहसिल अधिकारी यांची दिवाळी जोरात होणार असल्याचे चित्र सध्या शिरूर तालुक्यात दिसत आहे.
कोणताही रॉयटी टॅक्स न भरता व थोडा फार भरला तरी,६ ते ७ ब्रास माती वाहतूक शिरूर शहरातून केली जाते आहे.
रॉयटी भरून माती उपसा करणे बंधन कारक आहे,शिवाय ही माती ज्या विट भट्टी पर्यंत नेली जाते, त्या ही अनधिकृत आहेत का?असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
शिरूर शहरातून होत असणारी ही माती वाहतूक श्रीगोंदा व काही प्रमाणात शिरूर तालुक्यातून होत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय ही माती वाहतूक करणारे हायवा गाड्या दिवस रात्र चालू आहेत व शिवाय या हायवा गाड्या परवानगी पेक्षा जास्त प्रमाणात भरून माती वाहतूक करत असताना,मोठ्या प्रमाणात माती रोड वर व प्रवास करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात जात असल्याने अपघात होण्याची भीती वाढत आहे.
शिवाय या हायवा गाड्याना नंबर नसल्या मुळे व नेमक्या या कुणाच्या आहेत हे फक्त हपते गोळा करणाऱ्या प्रशासना च्या काही लोकांना माहिती आहेत व या गाड्या मुळे जर अपघात झाला तर ? कोण जबाबदार असणार आहे, असा प्रश्न निर्माण होतो आहे.
