शिरूर प्रतिनिधी:
गणेशउत्सव काळात पर्यावरण पूरक गणेशउत्सव, सुंदर देखावे, सामाजिक उपक्रम व सर्वधर्मीय सलोखा आशा क्षेत्रात उल्लेखननीय कार्य करणाऱ्या गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन शिरूर तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते योगेश सुदामराव जामदार यांच्या वतीने करण्यात आले होते.
शिरूर च्या कुंभार समाजाच्या वतीने शिरूर शहरांत अनेक सामाजिक उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून घेतले जातात त्यात वाचनालय, पाणपोई, महिला सबलिकरण, विविध धार्मिक कार्यक्रम हे वर्षभर चालू असतात.त्या पैकीच या वर्षी शहरातील सामाजिक भान जपणाऱ्या मंडळांचा या वेळी सत्कार करून त्यांना पुढील धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी योगेश जामदार म्हणाले “शिरूर च्या गणेशउत्सवाला एक जुनी परंपरा आहे, भव्य पौराणिक देखावे, पारंपरिक मिरवणूका या शिरूरच्या गणेशउत्सवाचे वैभव होते.ते वैभव लोप पाऊ नये म्हणून चांगले काम करणाऱ्या गणपती मंडळांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.”
या वेळी सिहंगर्जना गणेश मंडळाचा सत्कार विजय शिर्के यांच्या हस्ते, अजिंक्यतारा गणेश मंडळाचा सत्कार संतोष जामदार यांच्या हस्ते, युवा संघर्ष गणेश मंडळाचा सत्कार संतोष शिंदे व राजकुमार जामदार यांच्या हस्ते, महाराणा प्रताप व हनुमान गणेश मंडळाचा सत्कार विनायक जामदार यांच्या हस्ते तर कुंभार आळी गणेश मंडळाचा सन्मान संभाजी जामदार यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी कुंभार समाजाचे मा अध्यक्ष बाळासाहेब जामदार, उपाध्यक्ष शशिकांत शिर्के, मूर्तिकार संभाजी जामदार, बाबुराव जामदार, उद्योजक विजय शिर्के,संतोष जामदार, विनोद शिर्के, विक्रम जामदार,चेतन जामदार शहर अध्यक्ष अक्षय शिर्के, उपाध्यक्ष शंकर जामदार,चरण जामदार,शरद जामदार,दिपक शिर्के हे या वेळी उपस्थित होते.
