शिरूर प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा अनेक क्षेत्रापैकी सामाजिक क्षेत्रात भरीव व सातत्य पूर्ण कार्याबद्दल शिरूर येथील कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश सुदामराव जामदार यांना पुरस्कार देण्यात आला.
पत्रकार संघाच्या वतीने दर वर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाते. या वर्षी कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, आरोग्य, शिक्षण, सामाजिक कार्य आशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यातला युवा उद्योग भूषण पुरस्कार आदित्य धारिवाल यांना तर सामाजिक क्षेत्रात काम केल्याबद्दल योगेश जामदार यांना देशाचे दानशूर उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
या वेळी प्रकाश धारिवाल, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष निंबाळकर , शिरूर नगरपालिका मुख्याधिकारी प्रीतम पाटील, माहेर संस्थेच्या संस्थापक लुसी कुरियन, युवा उद्योजक आदित्य धारिवाल हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन संतोष शिंदे, अर्जुन बढे,यांच्या सह पत्रकार संघाच्या पत्रकारणी केले.
