शिरूर प्रतिनिधी
माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटनाही सुरळी गावामध्ये घडली आहे.तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आवर न घातल्यास गावात राहणे सुद्धा मुश्किल होईल. या घटनेतील सर्व आरोपींना त्वरित अटक करून यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करून जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात यावी.
राज्य भर आंदोलन:
संपूर्ण राज्यभर मातंग एकता राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे व संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्रअसे आंदोलन छेडले जाईल. याची शासनाने नोंद घ्यावी व सदर घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो अशा अशयाचे पत्र शिरूर पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय या ठिकाणी देण्यात आले.
यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष सतीश बागवे ,बौद्ध विकास महासंघाचे अध्यक्ष रमेश साळवे ,संघटनेचे उपाध्यक्ष राजू जाधव ,गोपाळ समाज शिरूर शहराध्यक्ष शिवाजी पवार ,कर्डिले वाडी ग्रामपंचायत कर्मचारी सोनाजी ससाने ,सामाजिक कार्यकर्ते मयूरजी शिंदे ,संघटनेचे खजिनदार काकासाहेब पाटोळे,या सर्वांच्या वतीने वरील आशयाचे निवेदन देण्यात आले.
