शिरूर (प्रतिनिधी) –सुदर्शन दरेकर
प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशन च्या वतीने शिरूर शहरातील सिद्धार्थ नगर येथील सम्यक बुद्ध विहारात वस्तीतील मुलांना मोफत अभ्यास वर्ग सुरू करण्यात आले आहे, अभ्यास वर्गाचा आजचा पहिला दिवस अतिशय उत्साही वातावरणात पार पडला. सिद्धार्थनगर आणि परिसरातील जवळपास 18 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
स्थानिक पालकांनी समाधान व्यक्त करत अगदी घराजवळच अभ्यास वर्ग सुरू झाल्याने आनंद व्यक्त केला आहे.
कुणा साठी आहेत हे मोफत वर्ग:
प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोजभाई सय्यद यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
“शिक्षण हेच आयुष्य बदलण्याचे प्रभावी साधन आहे” या ध्येयाने प्रेरित होऊन सामाजिक जाणिवेतून कार्य करणारे प्रविण शिशुपाल हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने आशेचा किरण ठरले आहेत.
प्रवीण शिशुपाल यांचे ध्येय:
स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून आणिm कोणतीही प्रसिद्धी न मागता, त्यांनी अनेक गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक साधनं नसतानाही अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या आधारामुळे शैक्षणिक प्रगती साधली आहे. शिशुपाल यांच्या मदतीमुळे अनेक घरांत ज्ञानाचा दीप उजळला असून, पालकांचे स्वप्न साकार झाले आहे.
त्यांचे कार्य केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. मार्गदर्शन शिबिरे, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, वैयक्तिक सल्ला आदी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि भविष्यासाठी दिशा निर्माण केली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.
शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवणारे प्रविण शिशुपाल हे खऱ्या अर्थाने समाजहितैषी व्यक्तिमत्त्व असून, त्यांचे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहे. त्यांच्या या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप मिळावे आणि समाजाने त्यांच्यासोबत उभे राहावे, हीच काळाची गरज आहे.
