शिरूर प्रतिनिधी:
श्री धुंदी बाबा विद्यालय, विद्यानगर येथे कै. विलास चव्हाण यांच्या स्मरणार्थ त्यांच्या शालेय वर्गमित्रांनी गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.
कै. विलास चव्हाण हे सामाजिक जाणिवेचे भान ठेवणारे आणि मदतीस नेहमी तत्पर राहणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांच्या शालेय मित्रमंडळींनी पुढाकार घेऊन गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, दप्तर आदी शालेय साहित्याचे वितरण केले.
यावेळी त्यांच्या मातोश्री चांगुणाबाई चव्हाण उपस्थित होत्या,
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, सुधाकर शिंदे, शैलेंद्र जाधव ,सुचेता वाघ हेमलता जगताप ,रियाज मुजावर ,सुनील लोंढे ,दिपाली मगर, सूर्यकांत खाडे आणि विजयसिंह महामुलकर इत्यादी शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांची उपस्थिती होती.
उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, समाजात अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
दहावीच्या 1987 -88 च्या बॅचमधील वर्गमित्रांच्या या उपक्रमामुळे कै. विलास चव्हाण यांची आठवण विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मकतेने कोरली गेली आहे.
