शिरूर प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर जि.पुणे ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना छावा चित्रपटाच्या विशेष शो चे स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानतर्फे आयोजन करून दाखवण्यात आला.
छत्रपती शंभूराजांच्या शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘छावा’ सिनेमाच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
न्हावरे येथील गुंजन चित्रपट गृहात निमगाव म्हाळुंगी येथील मुलांनी छावा हा चित्रपट शिक्षक व स्वराज्य प्रतिष्ठान च्या संस्थापक व सदस्य यांच्या सोबत पहिला.
निमगाव गावातून या मुलाना जाण्या येण्या करिता बस चे नियोजन प्रतिष्ठान कडून करण्यात आले होते.
स्वराज्य रक्षक प्रतिष्ठान चे अध्यक्ष तेजस यादव यांनी लहान मुलांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या धाडस,निडरता व स्वराज्य प्रती आदर कळवा म्हणून हा चित्रपट दाखवला असल्याचे सांगितले.






Users Today : 1
Users Yesterday : 9