शिरुर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील सरदवाडी ग्रामपंचायत भागात चालणाऱ्या सेंट चावरा स्कूल चे खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे आहेत ,हे मनसेचे पुणे उपजिल्हा अध्यक्ष महिबूब सय्यद,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसे शिरूर शहराध्यक्ष अदित्य मैड ,शिरूर शहर सचिव रवी लेंडे,शिरूर शहर संघटक अविनाश घोगरे यांनी ,लेखी पत्राद्वारे गटशिक्षण अधिकारी,पंचायत समिती शिरूर यांना देत,अशा शाळेवर कारवाई करण्यात यावी,अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे .
पालक व मुलाना इंग्लिश मिडीयम स्कूल दाखवत, तशी अडमिशन घेऊन 2016 ते आज पर्यंत शिक्षण देत शिक्षकांनी स्कूल च्या मुख्याध्यापक व सर्व संचालक मंडळ यांनी फसवले आहे.
वास्तवीक मराठी मिडीयम ची मान्यता असताना इंग्लिश माध्यमा तून शिकवत असलेल्या या स्कूल ने U-DISE क्रमांक नसताना व शाळेला कोणतीही अंतिम मान्यता नसताना शिक्षण देत,एक प्रकारचा आर्थिक व्यवसाय (फि गोळा करत)केला आहे.कारण इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्यासाठी किती फि मोजावी लागते हे जगजाहीर आहे.
ही अनाधिकृत शाळा कुणाच्या वरद हस्ता खाली चालू आहे ?
हा प्रश्न उपस्थित होत असताना,सरदवाडी ग्रामपंचायत,नेमकी कोणत्या माध्यमाची शाळा म्हणून कर घेते ,शाळेची नेमकी कोणती कागदपत्रे ग्रामपंचायत मधे देण्यात आलेली आहेत व अशा शाळेला आता ग्रामपंचायत काय नोटीस देणार ?हा प्रश्न उपस्थित होत आहे.






Users Today : 1
Users Yesterday : 9