वांद्रे येथे पहिले बालकुमार साहित्य संमेलन

Facebook
Twitter
WhatsApp

मुंबई वांद्रे येथील १०७ वर्षाची समृद्ध परंपरा लाभलेल्या नॅशनल लायब्ररी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित पाहिले एक दिवसीय बालकुमार साहित्य संमेलन सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत साजरे होणार आहे.
नॅशनल लायब्ररीच्या सभागृहात वांद्रे येथील बी.पी.ई शाळेचे वि‌द्यार्थी गणेश वंदना व छत्रपती शिवरायांना मानवंदना देणार असून संमेलनाचे उ‌द्घाटन माहिती, तंत्रज्ञान, सांस्कृतिक मंत्री मान. ॲड. आशिषजी शेलार यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्ष साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक एकनाथ आव्हाड आहेत. तर स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेत्री नयना आपटे या आहेत.
याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून प्रशांत पाटील (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, ठाणे), संजय बनसोड (जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर), जयु भाटकर (सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ), शेखर सामंत (सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ), भानुदास केसरे (मुख्याध्यापक बी.पी.ई. शाळा), दिपक पडवळ (अध्यक्ष नॅशनल लायब्ररी, वांद्रे), प्रमोद महाडिक (प्रमुख कार्यवाह नॅशनल लायब्ररी, वांद्रे) उपस्थित राहणार आहे.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.पी.ई शाळेच्या विद्यार्थिनी शर्मिन शेख आणि रिदा मणियार करणार आहेत.
सुप्रसिध्द बालसाहित्यकार आणि प्रकाशिका ज्योती कपिले ह्या कवी संमेलनाच्या अध्यक्ष असून
सदानंद पुंडपाळ (कोल्हापूर), रविंद्र सोनवणे (जळगाव), प्रतिभा जगदाळे (सांगली), श्रीकांत पेटकर (कल्याण), वीरभद्र मिरेवाड (नांदेड), मान, मोहन काळे (नवी मुंबई), बी.पी.ई शाळा आणि अनुयोग विद्यालयचे विद्यार्थी यांचा सहभाग आहे.

दुसऱ्या सत्रात नाट्यसंस्कार कला अकादमी, पुणे निर्मित संध्या कुलकर्णी लिखित आणि प्रसाद कुलकर्णी दिग्दर्शित जीर्णोध्दार’ हे अनेक पारितोषिके पटकवणारे बालनाट्य सादर केले जाणार आहे.कथाकथन सत्राचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कथाकार आणि कथाकथनकार विलास सिंदगीकर असून रंजना सानप (सातारा) बबन शिंदे (हिंगोली) मेघना साने (ठाणे) सतीश चिंदरकर (खार पूर्व) कथा सादरीकरणः कुमार. विजार खांबये (अनुयोग विद्यालय) कुमार सर्वेश ठोटम (अनुयोग विद्यालय) कुमारी मनश्री राणे (अनुयोग विद्यालय) यांचा सहभाग आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 6 7
Users Today : 1
Users Yesterday : 9