शिरूर प्रतिनीधी
शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीत शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार अशोक बापू पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्या पूर्वीच अपल्या पक्षाचा प्रचार चालु केला होता. परंतु महायुतीचा उमेदवार कोण? हेच ठरत नव्हते, कारण भाजपा चे प्रदिप दादा कंद व अजित दादा पवार गटाचे शांताराम बापू कटके यांनी निस्वार्थीपणे आपल्या पक्षाचे काम करत होते व 2024 ला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी आपल्याला भेटेल, अशी अपेक्षा ठेवत प्रचारही सुरू केला होता, परंतु काही दिवसापूर्वी शिवसेनेचे माऊली आबा कटके यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते.
त्यांना शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळून, त्यांनी मोठया थाटामाटात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, इतके दिवस पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिकपणे काम करणारे अजित दादा पवार गटाचे शांताराम कटके व भाजपाचे प्रदीप दादा कंद यांनी नाराज होत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.
अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दि.4/11/2024 रोजी जवळजवळ 14 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, भाजपाचे प्रदीप दादा कंद यांनीही पक्षाला मान देत, त्यांनी दिलेल्या उमेदवाराला म्हणजेच माऊली कटके यांना आपण निवडून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली.
त्याच दिवशी शांताराम बापू कटके यांनी हि आपला अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेत, अजित दादा पवार व त्यांच्या पक्षावर नाराजी व्यक्त केली, कारण पक्षाने कोणताही विचार न करता आयात उमेदवाराला उमेदवारी दिली की , ज्या उमेदवाराला पक्षाचा किंवा अजित दादां च्या कामांचा कसलाही कस नाही की गंध नाही, ज्याला पक्षाचा काही एक अनुभव नाही अशा उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे मी व माझे कार्यकर्ते व कुटुंब सर्वजण नाराज झालो आहे व आमच्या निस्वार्थी कामाचे असे फळ भेटत असेल तर आमची किंमत काय आहे आम्ही ते दाखवून देऊ, असे शांताराम बापू प्रसार माध्यमांशी बोलले.
दि.5/11/2024 रोजी आपण शिरूर हवेली मतदारसंघातील विकासासाठी व विकास कामासाठी , आमदार अशोक बापू पवार यांना पाठिंबा देत आहोत, असेच सांगत शांताराम बापू कटके यांनी अशोक पवार यांच्या प्रचाराला वढू बुद्रुक येथे संभाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होत सुरुवात केली.






Users Today : 4
Users Yesterday : 9