भोसरीत महेश लांडगे समर्थकांचा ‘महाविजयचा संकल्प’

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी: सागर पवार

पिंपरी, पुणे (दि. २९ ऑक्टोबर २०२४) भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी समर्थकांनी विजयाची हॅट्रिक करण्याचा निर्धार केला.

मंगळवारी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आणि प्रमुख मंदिरांमध्ये दर्शन घेउन पदयात्रेला सुरवात करण्यात आली. बापुजी बुआ चौक – लांडगे लिंबाजी तालिम मित्र मंडळ – भैरवनाथ मंदिर- मारुती मंदिर – पीएमटी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पाहार घालून अभिवादन – संत तुकाराम मंगल कार्यालय येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी-आरपीआय-मित्र पक्ष महायुतीच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघातून आमदार महेश लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना नेते इरफान सय्यद, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते.

ढोल-ताशांचा गजर अन्‌ ‘जय श्रीराम’चा नारा..!

ढोल-ताशा पथकांचा दणदणाट करीत ४० हजार समर्थकांचा जनसमुदाय पदयात्र सहभागी झाला होता. ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. प्रमुख चौकांत भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल-ताशांवर पीएमटी चौकात आमदार महेश लांडगे यांनी ठेका धरला. समर्थक-हितचिंतकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. विशेष म्हणजे, महायुतीच्या घटकपक्षांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला. अत्यंत नियोजनबद्ध काढलेल्या पदयात्रेची संत तुकाराम महाराज मंगल कार्यालय येथे सांगता करण्यात आली.

 

 

[“१० वर्षे विकासाची.. निरंतर विश्वासाची..’’ या ध्येयाने ही निवडून विकासाच्या मुद्यांवर आम्ही लढवत आहोत. पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी अविरतपणे काम करीत राहीन, असा शब्द देतो. भोसरी पंचक्रोशीतील सर्व सहकारी, मित्र परिवार आणि हितचिंतकांनी तसेच, महायुतीच्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. वडीलधाऱ्यांचे आशिर्वाद आणि साथ यामुळे विजयी शंखनाद झाला आहे. ]

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 5 5 3 0 7
Users Today : 15
Users Yesterday : 22