कोरेगाव भिमा: प्रतिनिधी(विनायक साबळे): अनैतिक संबंधांच्या कारणावरून एकाने व आईने मिळून मुलाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना लोणीकंद येथील खडी मशीन खदानी जवळ, तळेरानवस्ती येथे गुरुवारी (दि.१०) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल लालसिंग ठाकुर (वय ३०, रा. लोणीकंद) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. सुमित्रा लालसिंग ठाकुर (वय ५५, रा. लोणीकंद) व प्रफुल पुंडलिक ताथोड (वय ३५, रा. लोणीकंद) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असून मयताचा भाऊ सुनील लालसिंग ठाकुर (वय ३२, रा. पेरणेफाटा) याने फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुमित्रा व प्रफुल यांच्यामध्ये असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून सुमित्रा व अनिल यांच्यामध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून अनिल याच्या डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी करून ठार केले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.






Users Today : 4
Users Yesterday : 9