कोरेगाव प्रतिनिधी
नवनिर्वाचित प्रांत यशवंत माने यांचे अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक पुणे कार्यालय याठिकाणी बैठक पार पडली.
दोन तास चाललेल्या या बैठकीत तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली ,तक्रारी अर्ज दाखल केले त्यामध्ये प्रामुख्याने उरुळी कांचन येथील अनाधिकृत मुरुम ऊत्खन ,बकोरी येथील मुरुम ऊत्खन , तालुक्यात चालू असलेले प्लाॅटींग मुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक ओडे बुजवले गेले आहेत ,त्याबाबत पाहणी करणे, तसेच प्लाॅटींग करत असताना त्यामध्ये रस्ते, पाणी, स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर,कचरा प्रकल्प,ड्रेनेज या व्यवस्था करणेबाबत सर्व ग्रामपंचायतीनी अशाप्रकारे नोटीस काढण्याबाबत चर्चा झाली.
रेशनिंग कार्ड ऑनलाईन करणे, नवीन रेशनकार्डसाठी होणारा विलंब यासाठी चर्चा करण्यात आली .
अनेक वर्षांपासून १५५ ची प्रलंबीत असलेली प्रकरणे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे बोर्ड सर्व शासकीय कार्यालयात लावने, अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली .तसेच बैठकीस ऊपस्थीत न राहणारे शासकीय अधिकारी यांना नोटीस काढण्याबाबत चर्चा झाली,मा.लोक आयुक्त यांचे आदेश असुनही कारवाई होत नसेल तर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा अध्यक्ष म्हणून मला कारवाई करावी लागेल अशा कडक भाषेत प्रांत यशवंत माणे यांनी सर्व अधिकारी यांना सुनावले तसेच झालेल्या सर्व विषयांवर ताबडतोब कार्यवाही करण्याबाबत सुचना करण्यात आल्या.
भ्रष्टाचार निर्मूलन समितीची स्थापणा झाल्यापासून प्रथमच अशाप्रकारे सविस्तर चर्चा होऊन बैठक झाल्यामुळे प्रांत साहेब यांचे आभार मानण्यात आले.शेवटी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे सि़गम अधिकारी प्रांत यशवंत माणे यांचा सन्मान समीतीचे माध्यमातून करण्यात आला.सदर बैठकीसाठी हवेली तहसीलदार किरण सुरवशे, गटविकास अधिकारी भुषण जोशी भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य चंद्रकांत वारघडे, रामदास तुपे,माणिक सुपणार, संजय चव्हाण, माहिती सेवा समितीचे शहर सचीव सागर खांदवे हे उपस्थित होते चहा पाणी घेऊन बैठकीची सांगता झाली.








Users Today : 4
Users Yesterday : 9