शिरूर प्रतिनिधी
शिरूर येथील सविता अनिल बोरुडे यांनी आपल्या आधार छाया फाऊंडेशनच्या माध्यमातून , सामजिक व समाजाला दिशा देणारे अनेक कामे केली आहेत.
या बरोवर त्या एक आदर्श उधोगिनी ही आहेत, सामाजिक व उद्योग क्षेत्रात काम करताना त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांच्या याच कामाची पावती म्हणजेच, त्यांना पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात देण्यात आली आहे.
या संदर्भातील नियुक्तीचे पत्र शिरूर हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार व सुजाता भाभी पवार यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवती प्रियंका धोत्रे, आदिशक्ती महिला मंडळ अध्यक्ष शशिकला काळे, आधार छाया फाउंडेशन सचिव प्रीती बनसोडे, राणी ताई कर्डिले अध्यक्ष- रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था,व शिरूर शहर युवती अध्यक्ष गीतारानी आढाव आदी उपस्थित होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या.






Users Today : 4
Users Yesterday : 9