पुणे प्रतिनिधी : सागर पवार
आरटीओ कार्यालय मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार बंद होत आहे व तो आपण बंद करावा अन्यथा , आंदोलन करण्यात येईल अशा असे याचे पत्र प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या शिष्टमंडळाने परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांना काही दिवसापूर्वी दिले होते.
यावर आठ दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला गेला होता.
या निवेदनावर आपण कारवाई करणार असे आश्वासन श्रीमती अर्चना गायकवाड यांनी दिले होते.
नेमकी काय कारवाई केली यांची माहिती घेण्यासाठी शिष्टमंडळ गेले असता त्यांना अपुरी माहिती देण्याचा प्रयत्न प्रसासनाने केला.ही माहिती स्वीकारण्यास शिष्टमंडळाने नकार दिला व आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी लहूजी सेना महिला अध्यक्ष लोपाताई भगत,सदाभाऊ ढावरे पुणे शहर स्वागत अध्यक्ष,सुनिताताई अडागळे पुणे जिल्हा अध्यक्षा,कुमारभाऊ खंडागळे पुणे शहर सचिव,आकाश अडागळे कसबा मतदार अध्यक्ष,सविताताई खवळे मातंग आघाडी आरपीआय पश्चीम महाराष्ट्र,सीमाताई मांडलिक वारजे मतदारसंघ सहअध्यक्षा,रतनताई वैराट लहूजी शक्ती सेना पुणे उपाध्यक्षा आदी मान्यवर उपस्थित होते.






Users Today : 0
Users Yesterday : 9