- शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरातील, मार्केट जुने यार्ड मध्ये, मागील काही वर्षांपासून “शेतकरी बाजार” भरवण्यात सुरुवात करण्यात आला होता. हा बाजार सुरू करण्यामागील उद्देश फक्त एकच होता, शेतकरी ते ग्राहक असा भाजीपाला विकला जाईल.
पण आता चित्र उलट दिसते आहे, या शेतकरी बाजारात शेतकऱ्यांऐवजी घाऊक व्यापारी जास्त दिसतात. त्याला कारण बाजार समिती चे वसुली करण्यास सांगणारे सभापती, साचिव आहेत.
छोटे छोटे शेतकरी थोड्या प्रमाणात भाजी घेऊन बसले तरी, त्यांना तेवढीच पावती फाडावी लागते, कधी कधी तर जाणे- येणे व पावती मध्येच सर्व पैसे खर्च होतात, म्हणुन शेतकरी जेवढे पैसे मिळतील ते घेऊन व्यापाऱ्याला माल देतो, त्यामुळे तो भरपूर कष्ट करून ही गरीब राहतो व व्यापारी तोच भाजीपाला घेऊन जास्त किमतीत विकतो.
शिरूर मार्केट यार्ड मध्ये पाऊस पडला तर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, तिथे येणारा शेतकरी व ग्राहक दोघे ही या चिखलाला कंटाळले आहेत. बाजार घेण्यासाठी पायी किंव्हा टू व्हीलर गाडी चालवणे कठीण झाले आहेत. रोज पावत्या घेणाऱ्या लोकांना फक्त पावत्या गोळा करता येतात का? त्यांना चिखल दिसत नाही का?
पावत्या गोळा करून जमा होणारी रक्कम नेमकी कोणत्या ठिकाणी वापरली जाते? भाजार समितीत असणाऱ्या गाळ्याचे भाडे ही येते, मग चिखल रुपी बाजारात थोडा वापरला का जात नाही? की यांना फक्त पावत्याशी मतलब आहे, बाकी काही घेणे देणे नाही.






Users Today : 4
Users Yesterday : 9