सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वारखडे शिवसह्याद्री पुरस्कार

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:
शिवसह्याद्री चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे यांचे माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वारखडे यांना,पुणे येथील पत्रकार भवन मध्ये शिवसह्याद्री पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
हा सन्मान वारखडे राजेंद्र कोंढरे ,भाऊसाहेब जाधव (सर) प्राचार्य -मराठवाडा महाविद्यालय, सुरेश कोते सर -सर्वेसर्वा लिज्जत पापड ऊद्योग समुह यांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमात शेकडो गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली विशेष म्हणजेवरखडे यांना प्रमुख पाहुण्याचा मान देत ,मनोगत व्यक्त करण्याची संधी ही देण्यात आली.
यावेळी प्रथमतः कोंढरे सरांचे चंद्रकांत वरखडे यांनी आभार मानले व मला हा पुरस्कार आणि सन्मानपत्र आमचे सहकारी मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव गायकवाड यांचे प्रयत्नांमुळे मिळाला असल्यामुळे त्यांचेही त्यांनी आवर्जून आभार मानले.वनराईत काम करणारे सर्व वृक्ष मित्र ,बकोरी ग्रामस्थ यांचे ही यावेळी आठवणीने त्यांनी आभार मानले.
संस्थेचे सचिव प्रशांत महाराज भागवत हे सुद्धा या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 0
Users Today : 4
Users Yesterday : 9