भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांचे वाढदिवसा निमित्त बकोरी वनराईत वृक्षारोपण.

Facebook
Twitter
WhatsApp

बकोरी प्रतिनिधी
वाघोली शेजारील बकोरी या गावांमधील ऊजाड डोंगरावर वृक्ष मित्र चंद्रकांत वारघडे यांचे माध्यमातून खुप मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण, जलसंधारण अशी कामे 2017 पासून सुरू आहेत.
त्यामध्ये बकोरी येथील सरकारी गायरान गट नंबर 160 ,केसनंद येथील वन विभाग गट नंबर 112 मध्ये वृक्षारोपण चालू आहे. आजपर्यंत 75000 देशी प्रजातींची झाडे लावली आहेत.
त्यामध्ये जास्तीत जास्त वन औषधी झाडे लावली आहेत ,तसेच नुकतेच त्याठिकाणी एक कोटी लीटर क्षमतेचा छत्रपती जलाशयाचे काम पुर्ण झाले आहे आणि तो आता तुडुंब भरून वाहत आहे.
भविष्यात 1 कोटी झाडांचे वृक्षारोपण करण्याचे व 100 कोटी लीटर वाहून जाणारे पाणी जमिनीत जीरवण्याचे स्वप्न असल्याचे वारघडे यांनी सांगितले.
आज भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल भाऊ मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त वनराईत 151 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले .
सदर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपस्थितांमध्ये आई प्रतिष्ठान वाघोली चे अध्यक्ष मनोज कांकरीया, संजय गायकवाड सर( प्राचार्य ), विज्ञान प्रमुख मनीषा बोरा मॅडम,रसायन शास्त्र प्रमुख डॉ रुपाली गुलालकरी मॅडम,प्रा.जगताप मॅडम,प्रा.कोपरकर सर ,प्रा.मानवनकर मॅडम,प्रा.जगताप सर ,प्रा.कांबळे मॅडम, डॉ स्वाती मॅडम, विलास पाटील सर ,सचीन कुलकर्णी,कमलेश जैन,नवनाथ बउळे, वनराईचे सर्वेसर्वा वृक्ष मित्र चंद्रकांत वारघडे, माहिती सेवा समितीचे हवेली अध्यक्ष कमलेश बहीरट,ऊमेश गजमल,वामण धनगर, तसेच सर्व विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानचे माध्यमातून हॉटेल वनराई येथे नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.
वनराई चे माध्यमातून प्राचार्य संजय गायकवाड सर यांचा सन्मान मनोज कांकरीया यांचे हस्ते करण्यात आला.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 0
Users Today : 4
Users Yesterday : 9